द वॉल राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा नवीन कोच, बीसीसीआयकडून माहिती  

नवी दिल्ली । कोरोनामुळे आयपीएल पूर्ण झाली नाही, ती रद्द करण्यात आली. आयपीएलनंतर  भारतीय क्रिकेट टीममध्ये अनेक बदल केले जात आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी सौरभ गांगुली यांनी एकाच वेळी दोन भारतीय टीम दोन वेगवेगळ्या देशात खेळणार असल्याचे देखील सांगितले आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांची टीम इंडियाच्या कोचसाठी निवड झाली आहे.

‘द वॉल’ म्हणून ओळख असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा कोच म्हणून सूत्रे हातात घेणार आहे. सध्या राहुल द्रविड बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. या अगोदर राहुल द्रविड टीम इंडियाच्या अंडर-१९ टीमचा कोच होता.

राहुल द्रविडकडे क्रिकेट संघाचा मोठा अनुभव आहे. भारतीय क्रिकेट संघाला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी त्याचा मोठा हात आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने अंडर-१९ वर्ल्डकप देखील जिंकला होता.

यामुळे त्याच्याकडे आता ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाती अनेक नवीन खेळाडू हे राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. यामुळे त्याला सर्वांच्या खेळाची माहिती आहे. यामुळे संघाला फायदा होणार आहे.

राहुल द्रविड जरी टीम इंडियाचा कोच होणार असला तरी तो विद्यमान कोच रवी शास्त्री यांची जागा घेऊ शकणार नाही. भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या टीमचा कर्णधार कोण असणार हे अजून निश्चित झाले नाही.

मात्र या टीमचा कोच राहुल द्रविड असणार आहे असे बीसीसीआयने निश्चित केले आहे. श्रीलंका दौऱ्याच्या वेळी रवी शास्त्रीसह संपूर्ण स्टाफ हा इंग्लंडमध्ये असणार आहे. यामुळे नव्या टीमला प्रशिक्षण देण्यासाठी राहुल द्रविड हेच योग्य नाव असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणाऱ्या प्रियकराला घडवली अद्दल; सासरच्यांनी हुंडा म्हणून दिले चड्डी बनियन

चक्क शिक्षकच करत होता कोरोना रूग्णांवर उपचार; पोलीसांनी केली अटक

२०११ ला पाकिस्तानी खेळाडूंना ताज हॉटेलमध्ये थांबू देण्यासाठी तयार का नव्हती भारतीय टीम?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.