Rahibai popere | भाषणातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली म्हणून राहीबाई पेपरे यांना भाषण आटोपते घेण्यास भाग पाडल्याचा आरोप होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहीबाई पोपरे भाषण करत होत्या. त्या भाषण करत असताना भारतीय सायन्स काँग्रेसच्या कन्वेनियर आणि भाजपच्या माजी नगरसेविका कल्पना पांडे त्यांच्या समोरील माईक बंद केला.
झालं असं होतं की, बीज माता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पद्मश्री राहीबाई पेपरे यांचे भाषण सुरू होते. त्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या, शेतकरी विज्ञान काँग्रेसमध्ये भाषण करत होत्या. यावेळी त्या बोलत असताना म्हणाल्या की, मी पद्मश्री पुरस्कार स्विकारायला गेले.
पुरस्कार स्विकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळने गावात अद्याप विकास पोहोचला नाही असे सांगितले. गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना तीन किलोमीटर पायी जावे लागते. हे सगळं त्यांनी मोदींना सांगितलं होतं असं त्या भाषणावेळी म्हणाल्या.
त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी माझ्या गावात येण्याची तयारी दाखवली होती. मी त्यांना त्यावेळी म्हटलं होतं की, तुम्हाला हेलिकॉप्टर घेऊन गावात यावं लागेल. कारण गावात रस्ताच नाही. पाटील यांच्या भेटीनंतरही गावात काहीच फरक पडला नाही.
बीजमाता म्हणून प्रसिद्धी मिळाली पण माझ्या गावात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यादरम्यान, त्यांच्या समोरील माईक बंद केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपच्या माजी नगरसेविका कल्पना पांडे त्यांच्याजवळ आल्या आणि त्यांनी माईकच बंद केला असा आरोप होत आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
विरोधकांनी आता यावरून सत्ताधारी पक्षाला वेठीस धरण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी राहीबाई पेपरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर सडकून टीका करण्यास सुरूवात केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पद्मश्री राहीबाई पोपेरे – गावात रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मी पंतप्रधान, राष्ट्रपतींना भेटली पण सुविधा मिळाली नाही, असं बोलताच सायन्स काँग्रेसच्या आयोजकांनी माईकच बंद केला. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @PMOIndia pic.twitter.com/5eBSzyReAt
— Sandeep Bhujabal (@SandeepBhujaba2) January 6, 2023
महत्वाच्या बातम्या
sanjay raut : …तर नारायण राणे ५० वर्षांसाठी तुरूंगात जाणार
आधी त्याच्यासोबत केला डान्स अन् मग स्टेजवरच केले किस; गौतमी पाटीलचा व्हिडीओ आला समोर
‘भारतात जे घडत आहे ते जगात कुठेही नाही’; जाणून घ्या मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला कुणाकडे करत आहेत इशारा
मोहरीच्या पिकातून मिळाले एक कोटी, त्या पैशांतून शेतकऱ्यांनी बांधली दोन भव्या मंदिरे; वाचा किस्सा..