मुंबई | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. खेळाच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला एकापाठोपाठ एक धक्के दिले. भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा पॅट कमिन्सच्या चेंडूवर बाद झाला. पॅट कमिन्सच्या भन्नाट चेंडूने रहाणेचा त्रिफळा उडावला आहे.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात रहाणे बाद झाला. पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू रहाणेने थर्ड मॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पण या चेंडूने रहाणेच्या बॅटच्या कोपऱ्याला स्पर्श करत स्टंम्प उडवला.
Pressure, pressure, pressure! Cummins ends Rahane's resistance! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/LEsF5a70IE
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
दरम्यान, मागच्या कसोटीत शतक झळकवण्याऱ्या कर्णधार रहाणेकडून संघाला मोठ्या खेळाच्या अपेक्षा होत्या. रहाणेने ७० चेंडू खेळून २२ धावा केल्या. यानंतर त्याच्या मागेच हनुमा विहारी माघारी परतला.
पॅट कमिन्सने त्याआधी दुसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा या दोघांची अर्धशतक झाल्यानंतर त्यांना बाद केले होते. दरम्यान, यापुर्वी ऍडीलेड कसोटी गमावल्यानंतर भारताने मेलबर्न कसोटीत पुनरागमन केले. अशाच विजयाची अपेक्षा तिसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेटप्रेमींना आहे. ही कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी रोहीत शर्माऐवजी श्रेयस अय्यरची निवड?
जिंकलस भावा! चुकला तरी संभाळून घेतो तोच खरा कर्णधार; मैदानावरील ‘त्या’ प्रसंगावर रहाणे म्हणाला..
अजिंक्यच्या नेतृत्वाखाली मेलबर्नमध्ये भारताचा विजय, यावर मायदेशी परतलेला कोहली म्हणतो….