Share

रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित तरुणीचे संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली…

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे(Shivsena) नेते रघुनाथ कुचिक(Raghunath Kuchik) यांच्यावर एका तरुणीने लग्नाचे अमिष दाखवत दाखवत बलात्कार केल्याचा आरोप केला होता. लैंगिक अत्याचारानंतर मला गर्भपात देखील करायला लावला, असा आरोप देखील त्या तरुणीने केला होता. या प्रकरणात रघुनाथ कुचिक यांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची लगेच जामिनावर सुटका करण्यात आली.(raghunath kuchik case victim women allegations on nilam gorhe and sanjay raut )

यावरून भाजप(BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. अखेर शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करणारी तरुणी माध्यमांसमोर आली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना पीडित तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. याबाबतीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली होती. पण कोणीही मदत केली नाही, असा खुलासा पीडित तरुणीने केला आहे.

पीडित तरुणी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाली की, “सुरवातीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे मदत मागितली होती. पण कोणीही मदत केली नाही. गुन्हा दाखल करण्यापूर्वी मी नीलम गोऱ्हेना अनेक फोन केले. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर मी संजय राऊत यांना फोन केला होता”, असे पीडित तरुणीने सांगितले.

“त्यानंतर मी राज्य महिला आयोगाकडे आणि पोलिसांकडे देखील गेलो, पण मला मदत मिळाली नाही. त्यामुळे आपण चित्रा वाघ यांच्याकडे गेलो”, असे त्या तरुणीने सांगितले आहे. शिवसनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी फोन न उचलल्यामुळे आपण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना फोन केल्याचे त्या तरुणीने सांगितले.

पीडित तरुणी पुढे म्हणाली की, “नीलम गोऱ्हे यांनी फोन न उचलल्यामुळे मी संजय राऊतांना फोन केला. त्यांनी पहिल्या वेळी फोन उचलला नाही, दुसऱ्या वेळी त्यांनी फोन उचलला. तेव्हा मी त्यांना तुमच्या पक्षातील संबंधित व्यक्तीने मला फसवून लैंगिक अत्याचार करत जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचे सांगितलं. त्यांनी मला नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.”

“त्यावर मी त्यांना सांगितलं की, त्यांना अनेकदा फोन केले पण त्या फोन उचलत नाहीत. त्यावर मी स्वतः त्यांना फोन करतो, असं संजय राऊत यांनी सांगितले. त्यानंतर १०-१५ मिनिटात नीलम गोऱ्हे यांच्या पीएचा फोन आला आणि बंगल्यावर बोलावून घेतलं. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी मला सर्व घटनाक्रम विचारला. त्यांनी माझ्याकडून स्त्री आधार केंद्राचा फॉर्म भरून घेतला. पण त्यानंतर त्यांनी परत कधीही माझ्याशी संपर्क साधला नाही आणि संजय राऊत यांनी देखील मला परत फोन केला नाही”, असे पीडित तरुणीने सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
‘मला मंत्री केलं असतं तर..’ दोन दिवस नॉटरिचेबल असलेल्या आमदाराने बोलून दाखवली मनातली खंत
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींवर मोठी कारवाई; बुलडोझरने उद्ध्वस्त केली घरं
होळी खेळून घरी येताना प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, चाहत्यांवर कोसळला दुखाचा डोंगर

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now