“चौकीदार ही चोर है सिद्ध झाले आहे”; फ्रान्सच्या ‘त्या’ रिपोर्टवरून नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघात

 

 

राफेल लढाऊ प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उघड केले होते, त्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर धक्कादायक आरोप केले होते, आता फ्रान्सच्या एका मीडिया रिपोर्टमुळे राफेल प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

फ्रान्स पब्लिकेशन मीडिया रिपोर्टने दावा केला आहे की, २०१६ मध्ये भारत-फ्रान्स यांच्यात राफेल लढाऊ विमानाबाबत करार झाला होता, त्यावेळी डॅसॉल्टने भारतीय मध्यस्थीला काही रक्कम दिली होती, या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा फ्रान्सच्या अँटी करप्शन एजन्सीने डॅसॉल्टच्या खात्याचं ऑडिट केलं होतं.

आता याच मीडिया रिपोर्टच्या दाव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. चौकीदार ही चोर है हे आता सिद्ध झाले आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

राफेल लढाऊ विमान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उघड केले होते. मात्र सातत्याने खोटे बोलून व खोटी कागदपत्रे दाखवून केंद्र सरकारने या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचे काम करत होते.

आता राफेल लढाऊ विमान खरेदी करारानंतर डॅसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थीला एक दशलक्ष युरोंची लाच होती, असे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून समोर आले आहे, त्यामुळे ‘चौकीदार ही चोर है’, हे सिद्ध झाले असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.