…म्हणून चार दिवस मी घरातून बाहेर नव्हते पडले; राधिका आपटेने सांगितला न्युड व्हिडिओचा अनुभव

बॉलिवूडमध्ये खुप कमी अभिनेत्री अशा आहेत, ज्या खुप बोल्ड आणि बिंधास्त आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. तिने अनेक हिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अशात राधिका आपटेने एका मुलाखतीत तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे. काही वर्षांपुर्वी राधिका आपटेचा न्युड व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी तिला खुप मानसिक त्रास सहन करावा लागला होता, असे राधिकाने म्हटले आहे.

त्या व्हिडिओमध्ये राधिका न्युड दिसत होती. हा व्हिडिओ २०१६ साली प्रदर्शित झालेल्या अनेक कथांवर आधारित मेडली या चित्रपटातील क्लिन शेवेन या कथेचा एक भाग होता. या मुलाखतीत तिने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे.

जेव्हा क्लिन शेवेन चित्रपटाचे शुटींग चालू होती. तेव्हा माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मला त्या घटनेने जबर धक्का बसला होता. लोकांनी मला खुप वाईट पद्धतीने ट्रोल केले होते, असे राधिका आपटेने म्हटले आहे.

तेव्हा मी चार दिवस घरातून बाहेर पडले नव्हते. यामुळे नाही की सोशल मीडियावर मला ट्रोल केले गेले होते. कारण तेव्हा माझा ड्रायव्हर, वॉचमेन त्या व्हिडिओ क्लिपमुळे मला ओळखू लागले होते. ते माझ्यासाठी खुप विचित्र होते, असेही राधिका आपटेने म्हटले आहे.

तो एक न्युड व्हिडिओ होता, ते फोटो न्युड असाताना घेतलेली सेल्फी होती. एक समंजस व्यक्ती अंदाज लावू शकतो, की ती मी नव्हते. त्यानंतर जेव्हा मी पार्च्डसाठी पुन्हा न्युडसीन देण्यासाठी तयार झाले, तेव्हा मला वाटले की आता लपवण्यासारखे राहिलेच नाहीये. माझ्यासाठी तो सीन देणे खुप अवघड होते. त्यामुळे मी तसा सीन पुन्हा देऊ शकले नाही, असेही राधिका आपटेने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मुंबईत आढळले म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण, ४ रुग्णांचा झाला मृत्यु
प्रेयसीने जबरदस्तीने केले तरुणासोबत लग्न अन् लैंगिक शोषण; वाशिममधील धक्कादायक घटना
मालाडमध्ये फांदी पडून हेल्मेटचे झाले दोन तुकडे अन् तरुणाचा मृत्यु; थरारक व्हिडिओ आला समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.