‘राज’ चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री आठवली का? जाणून घ्या आज काय करते

आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने फक्त एक चित्रपट केला आणि ती स्टार झाली होती. रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री आज कुठे आहे आणि काय करते? हे कोणालाही माहीती नाही. लोकं आजही त्या अभिनेत्रीबद्दल इंटरनेटवर शोधत असतात. पण कोणालाही तिच्याबद्दल काहीही माहीती नाही.

या अभिनेत्रीचे नाव आहे मालिनी शर्मा. मालिनीने ‘राज’ चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटामध्ये तिने मालिनीची भुमिका निभावली होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मालिनी रातोरात सुपरस्टार झाली होती. बॉलीवूडची नेकस्ट सुपरस्टार म्हणून तिच्याकडे पाहीले जाऊ लागले होते.

चित्रपटामध्ये मालिनीने बिपाशा बासूला चांगलीच टक्कर दिली होती. दोघींच्या सुंदरतेने प्रेक्षकांना घायाळ केले होते. मालिनी अनेकांची ड्रीम गर्ल बनली होती. पण ही ड्रीम गर्ल आज कुठे आहे? काय करते? हे कोणालाही माहीती नाही. जाणून घेऊया राज चित्रपटातील मालिनीबद्दल काही रोचक गोष्टी.

मालिनी शर्मा मूळची दिल्लीची होती. दिल्लीमध्ये मॉडेलिंग करत होती. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये तिची भेट अभिनेता प्रियांशू चॅटर्जीसोबत झाली. १९९७ मध्ये दोघांनी लग्न केले. प्रियांशूने तुम बिन, दिल का रिश्ता यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे. मालिनी दिल्लीची प्रसिद्ध मॉडेल होती.

अनेक वेळा कामासाठी ती मुंबईला यायची. या काळात ती मिल्खा सिंगच्या ‘सावन मै लग गई आग’ या गाण्यात दिसली. गाण्यामूळे मालिनी खुप प्रसिद्ध झाली होती. महेश भट्ट त्यांच्या चित्रपटासाठी नवीन चेहरा शोधत होते. त्यांनी या चित्रपटासाठी मालिनीची निवड केली.

मालिनी तिच्या वैयक्तिक आयूष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करत होती. तिचा प्रियांशूसोबत घटस्फोट झाला होता. त्यामूळे तिने कामावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. मालिनीने राज चित्रपटाला होकार दिला. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. २००२ साली राज सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

त्यासोबत चित्रपटामध्ये मालिनीने बिपाशा बासूला चांगलीच टक्कर दिली होती. या चित्रपटासाठी मालिनीला पुरस्कार देखील मिळाला होता. मालिनीवर चित्रीत झालेले गाणे देखील सुपरहिट झाले होते. त्यामूळे लोकांना मालिनीमध्ये खुप जास्त रुची निर्माण झाली होती. लोकांना तिला अजून चित्रपटांमध्ये पाहायचे होते.

त्यामूळे मालिनीवर अनेक प्रोडक्शन हाऊस पैसे खर्च करायला तयार होते. महेश भट्टने तिला ‘एनकाऊंटर’ चित्रपटासाठी साईन केले. चित्रपटाची सगळी तयारी झाली होती. या चित्रपटामध्ये मालिनी परत एकदा डिनो मोरियासोबत काम करणार होती. हा चित्रपट हिट होईल असे बोलले जात होते.

मालिनीला बॉलीवूडची नेकस्ट सुपरस्टार बनवण्याची सगळी तयारी झाली होती. पण शुटींग सुरु होण्याच्या दोन दिवस अगोदर मालिनीने चित्रपटाला नकार दिला. तिच्या नकारामूळे सर्वांनाच धक्का बसला होता.
सर्वांनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिने कोणाचेही ऐकले नाही.

मालिनीने एका यशस्वी चित्रपटानंतर बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला. इंडस्ट्रीमध्ये ही खुप मोठी गोष्ट झाली होती. बोलले जात होते की, मालिनीला तिचे स्टारडम सांभाळता आले नाही. एवढी प्रसिद्धि सांभाळणं तिला खुप कठिण जात होते. त्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयूष्यात देखील अनेक अडचणी सुरु होत्या. म्हणून तिने लाइमलाईटपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला.

बॉलीवूडला सोडल्यानंतर मालिनी परत एकदा मॉडेलिंग इंडस्ट्रीकडे वळाली. तिने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट केले. अनेक पुरस्कार जिंकले. पण सध्याच्या घडीला ती कुठे आहे आणि काय करत आहे याबद्दल कोणालाही माहीती नाही. इंडस्ट्री सोडल्यानंतर ती पुर्णपणे लोकांपासून दुर गेली आहे.

अनेक वेळा आपण बघितले आहे की, कलाकार इंडस्ट्रीमध्ये काम करतात. पण त्यांना यश मिळत नाही. तर दुसरीकडे मालिनीने तीन गाणे आणि एक चित्रपट केला होता. पण तरीही ती खुप मोठी स्टार झाली होती. आजही लोकं तिला इंटरनेटवर शोधत असतात. पण तिच्याबद्दल कोणतीही माहीती उपलब्ध नाही.

 

महत्वाच्या बातम्या –

वरुण धवनच्या बायकोने त्याला तीन वेळा केले होते रिजेक्ट; वाचा लव्ह स्टोरी

गायीचं शेण ५ रूपये किलोने विकत घेणार; गडकरींची मोठी घोषणा

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: फक्त ७५० रुपयांमध्ये केले होते लग्न नाना पाटेकरने लग्न; वाचा त्यांची लव्ह स्टोरी

जाणून घ्या मिलिंद गवळी यांची खरी लव्ह स्टोरी; लग्नासाठी ठेवली होती ‘ही’ अट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.