Share

आर माधवनच्या मुलाने उंचावली महाराष्ट्राची मान! पटकावली 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके

बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने ‘खेलो इंडिया युथ गेम्स 2023’ मध्ये सात पदके जिंकली आहेत. वेदांतने या गेममध्ये 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके जिंकली आहेत. आता मुलाच्या या विजयानंतर माधवनने सोशल मीडियावर वेदांतचे फोटो शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.

या फोटोंमध्ये वेदांत ट्रॉफी घेऊन आणि गळ्यात सर्व पदके घातलेले दिसत आहेत. माधवनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘अपेक्षा फर्नांडिस आणि वेदांत यांची कामगिरी पाहून खूप आनंद झाला. शिवराज सिंह चौहान आणि अनुराग ठाकूरसोबत इतरांचेही आभार मानायचे आहेत, ज्यांनी ते अप्रतिम पद्धतीने आयोजित केले. मला आज खूप अभिमान वाटत आहे.

माधवनने आणखी एका पोस्टद्वारे सांगितले की, ‘वेदांतने 100 मीटर, 200 मीटर आणि 1500 मीटरमध्ये सुवर्ण, 400 मीटर आणि 800 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.’ तिसर्‍या पोस्टमध्ये माधवनने खेलो इंडिया युथ गेम्समधील महाराष्ट्र संघाच्या बाजूने लिहिले, ‘महाराष्ट्र संघाचे 2 ट्रॉफी जिंकल्याबद्दल अभिनंदन. 1 ट्रॉफी स्विमिंग संघाने आणि 2 ट्रॉफी ओवरऑल चॅम्पियनशिप ट्रॉफी खेलो इंडियामध्ये जिंकली आहे.

सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी वेदांतला सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात अशी माधवनची इच्छा होती. एका मुलाखतीत याविषयी बोलताना माधवन म्हणाले होते की, ‘मुंबईतील मोठे स्विमिंग पूल कोविडमुळे बंद आहेत किंवा तेथे सुविधा नाहीत. या कारणास्तव, आम्ही वेदांतसोबत दुबईमध्ये आहोत, जिथे तो एका मोठ्या पूलमध्ये प्रशिक्षण घेतो.

ऑलिम्पिकचे स्वप्न साकार करण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात मी आणि सरिता नेहमीच त्याच्यासोबत आहोत. वेदांतने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रासाठी एकूण 7 पदके जिंकली होती.

बसवानगुडी एक्वाटिक सेंटर, बंगळुरू येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत त्याने 4 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकली. यावर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आर माधवनचे अभिनंदन केले होते. याशिवाय मुलाच्या चांगल्या संगोपनाबद्दलही माधवनचे कौतुक करण्यात आले.

पहिला गेल तर फिल्म स्टार मुले केवळ चित्रपटातच करिअर करण्याला प्राधान्य देतात, असे सामान्यतः दिसून येते. पण वेदांतने स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे वेदांतचे स्वप्न असून या दिशेने तो अनेक वर्षांपासून काम करत आहे.

आर माधवन यांनीही वेदांतला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यांना आनंद आहे की त्यांचा मुलगा अभिनय आणि चित्रपटांव्यतिरिक्त इतर जगातही आपल्या देशाचे नाव रोशन करत आहे.

महत्वाच्या बातम्या
मोदी मुस्लिमांना भेटले, त्यांच्यासाठी रोटी बनवली, हे मी केलं असतं तर म्हणले असते हिंदुत्व सोडलं
मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का? श्रीकांत शिंदेंची उचलबांगडी होणार? भाजपच्या हालचालींनी फुटला घाम
मित्र एमसी स्टॅन विजेता होताच शिव ठाकरेच्या मनातल्या वेदना आल्या बाहेर; म्हणाला, ‘मीच खरा…’

आंतरराष्ट्रीय खेळ ताज्या बातम्या तुमची गोष्ट बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now