Share

R Madhavan : साऊथच्या ‘या’ स्टार अभिनेत्याने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी दिली लूकटेस्ट, पण अक्षयलाच लागला जॅकपॉट

Akshay Kumar

R Madhavan : नुकतीच “वेडात मराठे वीर दौडले सात” या मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे. महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. आता या चित्रपटाबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आर. माधवन याने या चित्रपटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी लुकटेस्ट केली असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमुळे चाहत्यांकडून त्याचे प्रचंड कौतुकही झाले होते.

शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी त्याची लुकटेस्ट झाली असली तरीही काही कारणांमुळे त्याला ही भूमिका मिळू शकली नाही. त्यामुळे शिवरायांची भूमिका न मिळाल्याची खंतही आर. माधवनने या फोटोच्या खाली व्यक्त केली होती.

“वेडात मराठे वीर दौडले सात” हा चित्रपट २०२३ च्या दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. परंतु, त्याची ही भूमिका नेटकऱ्यांना फारशी आवडली नाही.

त्यामुळे अक्षय कुमारच्या या भूमिकेवरून सोशल मीडियावर प्रचंड कॉमेंट्स करण्यात आल्या. त्यांनतर आता आर. माधवने सुद्धा या भूमिकेसाठी लूक टेस्ट केली असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी नुकताच शिवरायांवर आधारित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येऊन गेला. यात अभिनेता सुबोध भावेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात बिग बॉस मराठी फेम विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे तसेच हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर आणि प्रवीण तरडे हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा मराठीतील दुसरा बहुभाषिक चित्रपट आहे.

महत्वाच्या बातम्या
Mahesh Tilekar : शिवरायांच्या इतिहासातील खोट्या घटना दाखवून लोकांना लुटण्यापेक्षा…; मराठी दिग्दर्शकाने झाप झाप झापले
Marathi Movie : ‘वेडात दौडले वीर मराठी सात’ सिनेमाची घोषणा! अक्षयकुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
Marathi Movie : ‘मराठी चित्रपटांना भीक लागलीय वाटतं, छत्रपती फक्त नाव नाही तर काळजाचा विषय आहे’
Mahesh Tilekar : शिवाजी महाराजांचा चूकीचा इतिहास दाखवण्याचं पाप करण्यापेक्षा; प्रसिद्ध दिग्दर्शकाने निर्मात्यांना झापले

ताज्या बातम्या इतर मनोरंजन

Join WhatsApp

Join Now