आणखी किती वर्ष तपास करणार?, दाभोळकर, पानसरेंच्या हत्या प्रकरणी हायकोर्टाचा संतप्त सवाल

मुंबई | अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर २०१३ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूरमध्ये २०१५ मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास करत असणाऱ्या तपास यंत्रणांना हायकोर्टाने खडेबोल सूनावले आहेत.

उच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी आणि सीबीआयला आणखी किती वर्ष तपास करणार? असा सवाल विचारत तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. दाभोळकर यांच्या हत्येला आठ वर्ष, तर पानसरे यांच्या हत्येला सहा वर्षे झाली आहेत.

राज्यातील तपास यंत्रणा काय करत आहे?, दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येचा तपास अजून किती दिवस चालणार? असा सवाल न्यायमूर्ती शिंदे आणि पितळ यांनी केला आहे. येत्या ३० मार्चला होणाऱ्या सूनावणीमध्ये आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करावा. असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीची स्थापना केली होती. समितीमार्फत ते समाजातील अंधश्रध्दा दूर करत. त्याबद्दल लोकांना ते जागरूक करत होते.  मॉर्निंग वॉकला गेल्यावर दूचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली होती. दाभोळकर यांचा मुलगा डॉ. हमीद दाभोळकर यांनी दाभोळकरांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे.

गोविंद पानसरे हे एक मोठे लेखक होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.  समाजातील कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे प्रश्न पानसरे यांनी सोडवले आहेत. पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला होता.

महत्वाच्या बातम्या-
भारीच! ५० रूपयांत १००० किलोमीटर चालते ‘ही’ ई-सायकल, फोनसारखी होते चार्ज; किंमत फक्त…
‘अशी’ करा १५ फुट जागेत केसरची शेती आणि कमवा लाखो रुपये; दोन भावांचा भन्नाट प्रयोग
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ! एटीएममध्ये चोरी करणाऱ्या चोराला महिलेने शिकवला चांगलाच धडा

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.