शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Question to Marathi actor Eknath Shinde)
या प्रकरणावर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता अभिनेता सुमित राघवनने देखील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या प्रकरणावर आपलं मतं व्यक्त केलं आहे. अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? असा सवाल अभिनेता सुमित राघवनने एकनाथ शिंदे यांना केला आहे. अभिनेता सुमित राघवनने यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये अभिनेता सुमित राघवनने लिहिले आहे की, “एक साधा प्रश्न. माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म. वि. आ) तर मग एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला, जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे, अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला?”
एक साधा प्रश्न.
माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म. वि. आ) तर मग @mieknathshinde साहेब,तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला,जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे,अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? pic.twitter.com/AOGsnQCQTV— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) June 23, 2022
या पोस्टसोबत अभिनेता सुमित राघवनने एका वृत्तपत्रातील बातमीचा फोटो देखील शेअर केला आहे. ही पोस्ट अभिनेता सुमित राघवनने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. अभिनेता सुमित राघवनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे या बंडखोरीबाबत बोलताना म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड करावी लागत होती आणि ती आम्हाला मान्य नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “शिवसेना सोडण्याचा आमचा निर्णय नाही. आम्ही दुसऱ्या पक्षासोबतही जाणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
वर्षा बंगला सोडताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटले
नितीन देशमुखांचे अपहरण झालेच नव्हते, शिंदे गटाने दाखवला मोठा पुरावा, ‘ते’ फोटो केले व्हायरल
“शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, मुख्यमंत्र्यांनी मला शिकवण दिली, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?- दीपाली सय्यद