कोण आहेत प्यारे खान? ज्यांनी गरीब रूग्णांना ऑक्सिजन मिळावा म्हणून ८५ लाख खर्च केले

नागपुर | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लस, बेड, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. देशात फार भीषण परिस्थीती निर्माण झाली आहे. रुग्णांना जीव गमवावे लागत आहेत.

देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. केंद्र सरकारने झारखंडमधून बोकरो स्टील प्लांटमधून देशात ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरूवात केली. कोरोना काळात नेते मंडळी, अभिनेते, उद्योजक, इतकंच काय तर सर्व सामान्य लोकही आपल्या तऱ्हेने होईल तितकी मदत करत आहेत.

असाच एक नागपुरमधील अवलिया आहे. ज्याने स्वत: च्या खिशातून ८५ लाख रुपये खर्च करत नागपुरकरांची ऑक्सिजन समस्या सोडवण्यास पुढाकार घेतला आहे. प्यारे खान असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्यां कार्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

प्यारे खान हे नागपुरमधील ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील मोठं नाव आहे. त्यांच्या कंपनीचं नाव आश्मी रोड कॅरिअर्स असं आहे. देशातील अनेक मोठ्या कंपन्यांच वाहतूकीचं कॉन्ट्रक्ट त्यांच्या कंपनीकडे आहे. आश्मी रोड कॅरिअर्सच्या मालकीचे ३०० पेक्षा जास्त ट्रक आणि टॅंकर आहेत. तसेच १२०० कर्मचारी काम करतात.

प्यारे खान यांनी गरीबीतून अथक मेहनत घेत इतपर्यंत येत नाव कमावले आहे. सुरूवातीच्या काळात त्यांनी  नागपुर रेल्वे स्टेशनबाहेर संत्री सुध्दा विकली. वेळ पडली तर रिक्षा सुध्दा चालवली. त्यानंतर त्यांनी काहीतरी नवीन करायचं ठरवलं.

ट्रान्सपोर्ट क्षेत्रात पाय ठेवल्यानंतर हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला आणि आज ते मोठे उद्योजक म्हणून प्रसिध्द आहेत. सध्या ४०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती त्यांच्याकडे आहे.  त्यांना पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे.

कोरोनामुळे देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामूळे आपनही काहीतरी करून लोकांची मदत केली पाहिजे असं प्यारे खान यांना वाटलं. त्यांनी तब्बल ८५ लाख रुपये खर्चून भिलाई, रायपुर, विशाखापट्टनम येथून टॅंकरमधून ऑक्सिजन आणून ते नागपुरमधील हॉस्पीटल्सना पुरवले आहेत.

प्यारे खान यांनी आतापर्यंत ४०० मे टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. गरज पडली तर ब्रुसेल्स येथून टॅंकर एअरलिफ्ट करून रुग्णांना पुरवण्याचीही तयारी असल्याचं प्यारे खान सांगतात. मोठा उद्योगपती होऊनही गरीबीची जाण न विसरलेल्या प्यारे खान यांचे कौतूक होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, अन् दुसरीकडे सरकार, संघमालक IPL वर एवढा खर्च करतायेत’
ऑक्सिजन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये जीव तोडून काम करताहेत कामगार; जेवनही करत नाहीत
राजेश टोपेंचा व्हिडिओ चर्चेत, कर्तव्याला दिले प्राधान्य; गाडीतच केला अल्पोपहार अन् पुन्हा लागले कामाला
भारतीय खेळाडूंना नाही पण परदेशी क्रिकेटपटूला दया आली, ऑक्सीजनसाठी दान केले ३७ लाख

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.