पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक मिळवत रचला इतिहास; भारताला मिळवून दिले सगल दोन पदक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटन क्वीन पी व्ही सिंधूने भारताला कास्य पदक मिळवून दिले आहे. सिंधूने चीनच्या बिंग जिओ विरुद्धच्या सामन्यात २१-१३, २१-१५ अशा अकड्यांनी विजय मिळवला आहे.

तसेच हे पदक मिळवत सिंधूने इतिहास रचला आहे. कारण सलग दोनवेळा भारताची ऑलिम्पिक पदकाची कमाई करुन देणारी सिंधू पहिली भारतीय महिला बनली आहे. याआधी सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.

सिंधूने सामन्यात सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत ठेवली होती. पहिल्या सेटची धमाकेदार सुरुवात करत सिंधूने ४-० असा दवाब चिनी खेळाडू बिंग जिओवर निर्माण केला होता. त्यानंतर जिओनेही चांगली खेळी खेळत ५-५ अशी बरोबरी केली पण सिंधूने नंतर आपल्या जबरदस्त खेळीने २१-१३ असा पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने जबरदस्त सुरुवात केली. सिंधूने १०-७ अशी आघाडी निर्माण केली. पण त्यानंतर जिओ कमबॅक करत ११-११ ने खेळाला अजून रोमांचक बनवले. पण पुढे सिंधूने आपला खेळ सुरु केला आणि २१-१५ ने जिओला हरवून कास्य पदक मिळवले आहे.

दरम्यान, सिंधूने कास्य पदक जिंकल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच अनेक नेते, खेळाडू, कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे. सिंधूच्या या यशानंतर सर्व भारतीय भारावून गेले आहे.

महत्वाच्या बातम्या-

हस्तमैथुनाची सवय बेतली जीवावर; ५१ वर्षांच्या माणसाने केले अतिप्रमाणात हस्तमैथुन अन् पुढे…
कुंपनच शेत खातय! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन, वाळू उपसा करणाऱ्यांना करत होता मदत..
बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना! भरलग्नात नवऱ्याने नाही, तर दुसऱ्या तरुणानेच केले नवरीला किस; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.