बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू होणार निवृत्त? ट्विट करुन लिहले I retire…

भारताची महिला बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने I retire.. असे ट्विट करून चाहत्यांना धक्का दिला आहे. सिंधूने सोमवारी आपल्या सोशल मीडियावरून एक ट्विट केले, जे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. सिंधूने ट्विट करुन एक चित्र शेअर केले आहे ज्यात तिने लिहिले आहे की, ‘मी निवृत्त होत आहे.’

त्यानंतर तिने सांगितले की ही निवृत्ती खेळाकडून नव्हे तर भीती व नकारात्मक विचारसरणीमुळे आहे ज्यामुळे ती बर्‍याच काळापासून त्रस्त आहे. “कोरोनाच्या या संकटाने माझे डोळे उघडले. मला सराव करता आला नाही. कोर्टवरील प्रतिस्पर्धीला मी पराभूत करू शकते, परंतु या न दिसणाऱ्या शत्रूचा कसा सामना करू?” असे तिने ट्विट केले आहे.

पुढे सिंधु म्हणते “अनेक महिने मी घरीच आहे आणि घराबाहेर पडायचे का, हा प्रश्न अजूनही आपण स्वतःला विचारतीये. या काळात आपण काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अनेक बातम्याही वाचल्या. मलाही डेन्मार्क ओपनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करता आले नाही.”

“आज मी या सर्व संकटातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. मी नकारात्मकतेतून, सततच्या भीतीपासून निवृत्त होतेय.” अश्या आशयाचे तिने ट्विट केले आहे. पुढे सिंधु लिहिले की, “हे विधान वाचून तुम्हाला धक्का बसेल किंवा गोंधळ होईल हे मला समजू शकते, परंतु जेव्हा तुम्ही माझे विचार पूर्ण वाचाल तेव्हा तुम्हाला माझे विचार समजून घेता येतील आणि मला आशा आहे की तुम्ही मला पाठिंबा द्याल.”

सिंधूची ही पूर्ण पोस्ट करोना व्हायरस संदर्भात बचावासाठीची आहे. या व्हायरसपासून लढण्यासाठी स्वच्छतेबाबत तिने ही पोस्ट केली आहे. त्यामुळे ती खेळातून नाही तर नकारात्मक विचारातून मुक्त होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी सिंधू पहिली भारतीय महिला क्रीडापटू आहे. सायना नेहवालनंतर ऑलिम्पिक पदक पटकावणारी सिंधू केवळ दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

शाहिद आणि सैफबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला करिनाने दिले खास उत्तर म्हणाली….

दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात…

तुम्हाला माहीत आहे का? शाहरूख खानची चंद्रावर जमीन आहे जी त्याला गिफ्ट म्हणून मिळाली आहे..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.