रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मुलगी कतरीना तिखोनोवा झेलेन्स्की नावाच्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. पुतिनचा सर्वात वाईट शत्रू असलेल्या युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष यांचे नाव देखील झेलेन्स्की आहे. एका अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यामुळे सध्या रशियामध्ये खळबळ माजली आहे. (putin daughter date zelensky)
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे व्लादिमीर पुतिन यांच्या कुटूंबावर देखील परिणाम झाला आहे. या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीवर झाला आहे. कतरीना तिखोनोवा हीला आपल्या प्रियकराला भेटणे कठीण झाले आहे.
रशियन गुप्तचर सुरक्षा रक्षक सोबत असल्याने तिला मॉस्कोहून म्युनिकला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जाता येत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कतरीना तिखोनोवाच्या प्रियकराचे नाव इगोर झेलेन्स्की असे आहे. त्याला एक मुलगी देखील आहे. इगोर झेलेन्स्की एक व्यावसायिक बॅले डान्सर आणि दिग्दर्शक आहे.
एका रशियन वृत्तपत्रातून यासंदर्भातील खुलासा करण्यात आला आहे. कतरीना तिखोनोवा ही रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची धाकटी मुलगी आहे. कतरीना तिखोनोवा हीच्या आईचे नाव ल्युडमिला अलेक्झांड्रोव्हना ओचेरेटनाया असे आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि ल्युडमिला अलेक्झांड्रोव्हना ओचेरेटनाया यांचा विवाह १९८३ मध्ये झाला होता.
पण २०१३ मध्ये पुतिन आणि ल्युडमिला यांचा घटस्फोट झाला. व्लादिमीर पुतिन यांची मुलगी कतरीना तिखोनोवा यांचा यापूर्वी देखील विवाह झाला आहे. रशियातील सर्वात तरुण अब्जाधीश किरील शमालोव्हशी त्यांचं लग्न झालं होतं. पण २०१७ मध्ये बॅले डान्सरसोबत संबंध जुळल्यानंतर ते दोघे वेगळे झाले.
कतरीना तिखोनोवा अनेकवेळा प्रियकराला भेटण्यासाठी म्युनिकला जात असते. यावेळी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मुलगी कतरीना तिखोनोवा हीला सरकारी सुरक्षा पुरवण्यात येते. एका अहवालानुसार, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मुलगी कतरीना तिखोनोवाने ५० पेक्षा जास्त वेळा म्युनिकला प्रवास केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा खासदारकी मिळणार? राजकीय घडामोडींना वेग
सोनू म्हणाला, सर तुमच्या हाताखाली काम नाही करायचं, तेज प्रतापची झाली बोलती बंद, पहा व्हिडीओ
सेहवागने शोएब अख्तरच्या बॉलिंगची उडवली खिल्ली, म्हणाला, मी त्याच्या चेंडूवर चौकार मारला तर..