धक्कादायक! ताशी ११० किलोमीटर भरधाव वेगाने धावली ट्रेन; स्टेशन मागची इमारत झाली जमीनदोस्त

देशातील रेल्वेत बदल करण्याचा प्रयत्न सुरु असतो. लोकांना कमीत कमी वेळात आपले ठिकाण गाठता यावे, यासाठी रेल्वेची गती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. पण भारतात रेल्वेचा वेग वाढला, तर काय होऊ शकतं? याचे उदाहरण समोर आले आहे.

ताशी ११० किलोमीटर तासाने धावल्याने एक पुर्ण इमारत कोसळली आहे. रेल्वेची गती खुप असल्याने जमीन खुपच हादरली होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनची जवळची इमारत हालायला लागली आणि अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

मध्य प्रदेशच्या बुरहानपुरच्या चांदणी रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेस भरधाव वेगात गेल्याने ही इमारत कोसळली आहे. ही इमारत जास्त जुनी नसून या इमारतीला बनवून फक्त १४ वर्षे झाले होते.

विशेष म्हणजे रेल्वे गेल्याने इमारत पडल्याचे देशातच पहिलेच प्रकरण आहे. ही गाडी नेहमीच त्या रुळावरुन जात असते, पण रेल्वे गेल्याने अशी अचानक इमारत पडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ही रेल्वे गेल्याने कंपन इतके जोरदार झाले होते, की पहिल्यांदा स्टेशनच्या अधीक्षकांच्या खोलीच्या काचा फुटल्या. त्यानंतर फलक खाली पडले आणि सर्व सामान पडायला सुरुवात झाली. स्टेशनवर कार्यरत असलेले एएसए प्रदीपकुमार पवार रेल्वेला झेंडा दाखवण्यासाठी बाहेर आले. पण परिस्थिती पाहता, त्यांनी तिथून त्यांनी पळ काढला आणि लगेचच इमारत कोसळली. त्यामुळेच ते बचावले.

या घटनेची माहिती मिळताच भुसावळहून एडीआरएम मनोज सिन्हा, खंडवा एडीएन अजय सिंग, सिनियर डीएन राजेश चिखले, तातडीने घटनास्थळी पोहचले होते. तसेच त्यांनी या घटनेची चौकशी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘ही’ गोष्ट खाल्ल्याने माणूस राहतो तंदरुस्त; १११ वर्षांच्या आजोबांनी सांगितले आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य
जेव्हा संजय दत्तच्या घरात एके-५६ रायफल सापडली होती तेव्हा काय काय घडले होते? वाचा सविस्तर
फक्त १२ रनांचा टार्गेट पुर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने खेळल्या होत्या १६ ओव्हर; वाचा त्या ऐतिहासिक मॅचबद्दल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.