अल्लू अर्जुन(Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना(Rahmika Mandana) यांचा पुष्पा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट Amazon Prime वर आला असूनही बरेच लोक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जात आहेत. या चित्रपटाची कथा, गाणी यांची लोक चर्चा करत आहेत. पण यामध्ये चित्रपटातील स्त्री खलनायक अनुसया भारद्वाज हीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.(pushpa fil actress anusya bhardwaj photo)
पुष्पा चित्रपटात तिने निगेटिव्ह भूमिका निभावली आहे. या चित्रपटात तिने आपल्या छोट्याशा भूमिकेने संपूर्ण कथेला एक मनोरंजक ट्विस्ट आणला होता. या चित्रपटात ती थोडी विचित्र दिसते. पण खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसते. तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते घायाळ होतात.
या चित्रपटात अनसूया भारद्वाजने दक्षिणायनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने अतिशय आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. या भूमिकेचे सर्वजण कौतुक करत आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटात अनसूया भारद्वाज अशा कुटुंबातील असल्याचे दाखवण्यात आले आहे जिथे रक्तपात होत आहे. पण, अनुसया भारद्वाज खऱ्या आयुष्यात पूर्णपणे वेगळी आहे.
अनसूया भारद्वाज खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे. अनसूया भारद्वाज इन्स्टाग्रामवर खूप ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो चर्चेत आहेत. ३८ वर्षीय टीव्ही अँकर आणि सहाय्यक अभिनेत्री अनसूया भारद्वाज तिच्या छोट्या भूमिकांसह चित्रपटांमध्ये प्रभाव पाडण्यासाठी ओळखली जाते.
अनसूया चित्रपटात शीनूची या चंदन तस्कराची पत्नी म्हणून दाखवण्यात आली आहे. चित्रपटात तिच्यासाठी कुटुंब-मित्रांपेक्षा व्यवसाय महत्त्वाचा आहे. थोडीशी गडबड झाली तर थेट त्या व्यक्तीला ठार मारते, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पुष्पा चित्रपटाच्या भाग-१ मधील तिचा लूक सेठानीचा असला तरी येणाऱ्या भाग-२ मध्ये ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात कोट्यावधी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अल्लू अर्जुनाची बोलण्याची पद्धत प्रचंड गाजली. ’पुष्पा नाम समज के फ्लावर समजा क्या मै तो फायर है’ हा चित्रपटातील डायलॉग्स लोकप्रिय झाला होता. हा डायलॉग वापरून सध्या अनेक जण सोशल मीडियावर रिल्स बनवताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
तीन जवानांनी विवाहित महिलेवर केला बलात्कार; अश्लील व्हिडिओ काढून दिली धमकी, नंतर झाले फरार
बिग बॉसच्या सेटवर दिसली सलमान आणि मिथुन दा ची मैत्री, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
VIDEO: वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेता तिवारीने ‘या’ गाण्यावर केला डान्स, नेटकरी म्हणाले, ‘आम्हाला तुझी लाज वाटते’