‘पुण्याची मैना’ या गाण्यावर डान्स करून श्वेता ताजणे सोबत धुमाकूळ घालतीये अजून एक मुलगी;पहा व्हिडिओ

आजकालच्या काळात आपल्याला बरेचजण डान्सवेडे असलेले पाहायला मिळतात. काही महिन्यांपूर्वी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२० रोजी एका लग्नातील नवरीचा एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्या जोडीच नाव म्हणजे संकेत शिंदे आणि श्वेता ताजणे.

श्वेताने आपल्या पतीसाठी म्हणजे संकेत साठी लग्न मंडपात डान्स करत आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करत एन्ट्री केली होती. त्या व्हिडिओला खूप मोठ्या प्रमाणात पसंदी मिळाली होती. आजही तो व्हिडिओ प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात.

खर तर मुलीने आपल्याच लग्नात नाचलेल पाहण्याची अनेक लोकांची मानसिकता नसते. पण म्हणतात ना हौसेला मोल नसत. आणि श्वेताने स्वतः नवरी असून डान्स करण्याच धाडस दाखवल आणि अनेकांनी तीच कौतुक देखील केल. ‘मेरे सैय्या सुपरस्टार’ या गाण्यावर श्वेताने केलेला डान्स व्हिडिओला काही दिवसातच लाखो लोकांनी पहिला होता.

श्वेता मध्यंतरी परत एकदा तिच्या डान्सने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता. तिने तिचा आणखी एक डान्स व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला होता. सध्या सर्वत्र ‘पुण्याची मैना’ या गाण्याचा ट्रेंड चालू असून श्वेताने देखील याच गाण्यावर केलेल्या डान्स व्हिडिओला लाखो लोकांनी पसंती दाखवली होती.

तिच्या ‘पुण्याची मैना’ याच गाण्यावरील डान्स व्हिडिओ आता आणखी एका मुलीसोबत डूयेट म्हणजेच दोखींचा डान्स एकत्र करून सोशल मिडीयावर पुन्हा एकदा धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय. तसेच प्रेक्षकांना दोखींच्या डान्समध्ये कोणाचा डान्स जास्त पसंद आला आहे हे ही विचारण्यात आल आहे.

खरतर दोघींचाही डान्स अतिशय सुंदर आहे. परंतु प्रेक्षक आप-आपली मते मांडून डान्सविषयी आपल मत व्यक्त करणार हे नक्की. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की प्रेक्षकांना नक्की कोणाचा डान्स जास्त आवडतो.

हे हि वाचा =

एकेकाळी रस्त्यावर पिशव्या विकायचा, आज आहे २५० कोटींचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास

एकेकाळी रस्त्यावर पिशव्या विकायचा, आज आहे २५० कोटींचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास

…तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी उध्दव ठाकरेंच्या हाताखाली काम करावे- भाजप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.