Share

Panjabrao Dakh : पंजाबराव डखांनी सांगीतला हवामानाचा नवीन अंदाज; पुढील ४ दिवसांत ‘या’ जिल्ह्यात होणार तुफान पाऊस

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : राज्यात काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत काल जोरदार पाऊस कोसळला आहे. त्यातील पुणे जिल्ह्यात पावसाचा वेग जास्त असल्याचे पाहायला मिळाले.

आजपासून पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. आज दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील उर्वरित भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात कोकण विभागातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे तर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यासोबतच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्येदेखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील काही दिवस वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पुढचे काही दिवस सतर्क राहणे आवश्यक आहे.

यासोबतच आता हवामानतज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाजसुद्धा समोर आलेला आहे. पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, २२ सप्टेंबरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या कालावधीत कोसळणारा पाऊस हा भाग बदलत पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

तसेच १६ सप्टेंबरपर्यंत विदर्भातील अकोला जिल्हा आणि मुंबई, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नांदेड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली, अहमदनगर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यताही पंजाबराव डख यांनी आपल्या हवामान अंदाजामध्ये वर्तवली आहे. यासोबतच राज्यात २०, २१ आणि २२ तारखेलासुद्धा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या
Chandrashekhar Bawankule : ‘कल्याण लोकसभेसाठी शिंदे गटावर अवलंबून राहून चालणार नाही’; बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंच्या पोटात गोळा
Snakebite : झोपेत साप चावल्याने एकाच घरातील दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
T20 world cup : अखेर BCCI ने जाहीर केला टी-२० साठी भारतीय संघ; वाचा कोणत्या खेळाडूला मिळाली संधी
..तर उदय सामंतांना जिवंत जाळू, नाना पटोलोंसमोरच कार्यकर्त्याची जाहीर धमकी

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now