मोठी बातमी! पंजाबमध्ये राजकीय भूकंप, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरू आहे. असे असताना आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभागी न होताच त्यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला.

यामुळे पंजाबमध्ये मोठे राजकीय वारे वाहू लागले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केल्याचेही समजते. त्यात जर वाद संपला नाही तर मी राजीनामा देईन असंही अमरिंदर सिंग यांनी सांगितल्याचे म्हटले जात आहे. अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे की, जर मुख्यमंत्रीपदावरून हटवले तर राजीनामा दईन, अशीही माहिती समोर येत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीआधी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची निवासस्थानी बैठक घेतली होती.

अनेक आमदारांचा देखील त्यांना पाठिंबा होता. चंदिगढमधील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत त्यांच्या बाजुने असलेल्या आमदारांनी उपस्थिती लावली होती. सायंकाळी त्यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळही मागितली होती. यामुळे मोठी घडामोड होणार हे नक्की होते.

पंजाबमध्ये काँग्रेस पक्षातील कलह गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. हे मिटवण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांना दिल्लीमध्ये देखील बोलावण्यात आले होते. नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्यात वाद सुरू आहे.

अमरिंदर सिंग यांच्या विरोधात ४० आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. अपमानासह काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत, असे अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना सांगितले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.