अंडी चोरणे पोलिस शिपाईला पडले महागात; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच झाले निलंबन

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे अनेकांपर्यंत मदतीचा हात पोहचतो. तर गुन्हेगारांना शिक्षाही होण्यासही व्हिडिओमुळे होत राहते.

आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये पोलिस शिपाई अंडी चोरताना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता त्या पोलिस शिपाईला अंडी चोरणे चांगलेच महागात पडले आहे.

त्या पोलिस शिपाईला निलंबित करण्यात आलेले आहे. अंडी चोरतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल पंजाब पोलिसांनी घेतली होती. तसेच कारवाई करत त्या पोलिस शिपाईला निलंबित केले आहे.

पंजाबच्या फतेगड साहिब पोलिस ठाण्यातील प्रीतपाल सिंग असे त्या पोलिस शिपाईचे नाव होते. या शिपाईचा अंडी चोरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अंडी विकणारा माणूस जाग्यावर नसल्याचा फायदा घेत त्याने ती अंडी चोरली होती.

अंड्याच्या ट्रेमधून तो एक-एक अंडी खिशात भरताना दिसत आहे. अंडी मालक येतो, तेव्हा तिथून तो पोलिस शिपाई निघून जातो. हा सर्वप्रकार अंडी विकणाऱ्या माणसाच्या लक्षात येत नाही. पण एका नागरीकाने हा व्हिडिओ काढला असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले होते. तसेच या पोलिसावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी करत काही लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ वरिष्ठांकडे पोहचताच त्यांनी त्या पोलिस शिपाईवर कारवाई करत त्याला निलंबित केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘तुम्हाला मी सोडणार नाही’; ‘त्या’ प्रेक्षकांना सलमान खानने दिली कायदेशीर कारवाईची धमकी
शाब्बास पठ्ठ्या! गावाकडच्या मेकॅनिकने लावलाय भन्नाट शोध; १ लीटरमध्ये गाडी देते १५० किलोमीटर ॲव्हरेज
सर्वात जवळचा सहकारी राजीव सातवांच्या निधनानंतर राहूल गांधी झाले हळवे; दिली ह्रदयद्रावक प्रतिक्रीया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.