आई म्हणायचं की राक्षस! प्रियकरासोबत मिळून पोटच्या पोराचा काढला काटा, प्रेमात ठरत होता अडसर

लोक प्रेमात वाटेल ते करण्याच्या तयारीत असतात. याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. मात्र या घटनेमुळे आई आणि मुलं यांच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे. खरचं अलिकडच्या काळात आईची ममता हरवली आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा विचारला जाऊ लागला आहे.

कुठे ती आपल्या लेकरासाठी मोठमोठी संकटे झेलणारी आई आणि कुठे स्वत:च्या प्रेमप्रकरणामुळे पोटच्या मुलाचाच जीव घेणारी आई. घटना पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील झंडो गुजरू गावातील आहे. अनैतिक संबंधासाठी आईनेच प्रियकरासोबत मिळून २६ वर्षीय मुलाचा खून केला आहे.

प्रेमात आंधळी झालेल्या आईने आपल्या रक्ताच्या नात्याची हत्या केली आहे. इतकेच करुन ती थांबली नाही. तिने मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह गटारात फेकून दिला आहे. महिला आई म्हणण्याच्या लायकीचीच राहिली नाही. तिच्यासाठी राक्षस हाच शब्द योग्य ठरेल.

सविस्तर घटना अशी की, झंडो गुजरू या गावातील गटारीत एका मुलाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह स्थानिकांच्या नजरेस पडला. पोलीस घटनास्थळी पोहोचले मतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यात आले यानंतर त्या मुलाची ओळख पटली. रणदीप सिंग असे त्या २६ वर्षीय मुलाचे नाव होते.

मृत मुलाची आई रुपिंदरजीत कौर आणि सुखविंदर सिंग या दोघांमध्ये कित्येक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. याबाबत तिचा मुलगा रणदीप सिंग याला माहित झाले. तेव्हापासून घरात वाद होता. मुलगा वारंवार आईला असं करण्यापासून परावृत्त करत होता.

दोघांच्या प्रेमात अडचण ठरणाऱ्या मुलाचा शेवटी वैतागून आईनेच हत्या करण्याचा प्लॅन केला. नराधम आईने सुखविंदर सिंग आणि त्याचा मित्र गुरजित सिंग या दोघांच्या मदतीनं आपल्या मुलाचा खून केला. पोलिसांच्या चौकशीत ही माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी संबंधितांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
लाज सोडली! अंत्यसंस्काराला एकही आला नाही; मात्र दहाव्याला जेवायला १५० जण हजर
“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतो”
शाहरुख खानच्या मुलीने केले बिकीनी शुट; फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.