पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत. पंजाबचे(Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान आणि डॉ गुरप्रीत कौर यांचा विवाह सोहळा गुरुवारी चंडीगडमध्ये पार पडणार आहे. हा विवाह सोहळा अत्यंत लो प्रोफाइल आहे. त्यामुळे मोजकेच लोक या विवाह सोहळ्याला हजर राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.(Punjab chief minister bhagvant maan second marriage)
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे. इंद्रजित कौर ही मुख्यमंत्री भगवंत मान यांची पहिली पत्नी आहे. इंद्रजित कौर आणि भगवंत मान यांना दोन मुले आहेत. २०१६ मध्ये इंद्रजित कौर आणि भगवंत मान यांचा घटस्फोट झाला होता.
त्यांनतर इंद्रजित कौर मुलांना घेऊन अमेरिकेला गेल्या होत्या. घटस्फोट झाल्यानंतर भगवंत मान यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. “कोर्टाने मला सांगितलं की तुम्हाला दोन कुटूंबांपैकी एका कुटूंबाची निवड करायची आहे. मी पंजाबला निवडलं”, अशी प्रतिक्रिया भगवंत मान यांनी दिली होती. भगवंत मान 2014 मध्ये संगरूर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले होते.
त्यावेळी इंद्रजित कौर यांनी भगवंत मान यांचा प्रचार केला होता. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. चंडीगडमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया देखील उपस्थित राहणार आहेत.
या लग्न सोहळ्यासाठी सध्या जोरदार तयारी करण्यात येत आहे. भगवंत मान यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी दुसऱ्यांदा लग्न करावे. आईच्या इच्छेसाठी भगवंत मान या लग्नासाठी तयार झाल्याचे सांगितले जात आहे. भगवंत मान यांच्या लग्नाच्या तयारीची जबाबदारी आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राघव चढ्ढा यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
भगवंत मान यांचा विवाह सोहळा शीख रितीरिवाजानुसार पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. हा विवाह सोहळा अतिशय गुप्त ठेवण्यात आला आहे. पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने घवघवीत यश मिळवले होते. त्यानंतर ४८ वर्षीय भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात ‘त्या’ नेत्यांना मिळणार डच्चू: वाचा कुणाला कोणते खाते?
..तर आम्ही मातोश्रीवर परत जाऊ, बंडखोर आमदार संजय राठोडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
संपला विषय! एअर इंडियानंतर टाटांनी’ ही’ सरकारी कंपनी घेतली विकत, मोजले तब्बल 12 हजार कोटी