मानलं भावा! पठ्ठ्याने घरीच बनवली लाकडापासून भन्नाट सायकल…

मुंबई : कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरु झाला अन् लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे सर्वकाही ठप्प झाले होते. नोकरी, उद्योग, व्यवसाय सर्वच बंद झाल्यामुळे घरात बसणे हाच एक उत्तम पर्याय सर्वांच्या समोर होता. यामुळे नागरिकांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

परंतु, काही नागरिकांनी या लॉकडाऊनच्या कालावधीतील वेळ पूर्णपणे कामी लावला आहे. घरात बसून घरातच उपलब्ध होणाऱ्या गोष्टींपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या आहेत. भन्नाट कल्पना वापरून नवनवीन शोध लावला आहे.

अशीच भन्नाट कल्पना वापरून एका तरुणाने चक्क लाकडापासून सायकल तयार केली आहे. पंजाबचा रहिवासी असलेल्या एका ४० वर्षीय धनीराम सग्गु यांनी हा अनोखा प्रयोग केला आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कल्पनेचे सर्वस्तरातून कौतुक होतं आहे.

विशेष म्हणजे घरात न लागणाऱ्या सामग्रीपासून त्यांनी ही सायकल तयार केली आहे. यामध्ये घरातील प्लायवुड आणि जुन्या सायकलचे काही भाग यातून ही सायकल तयार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही सायकल तयार करण्यासाठी सुमारे २ – ३ महिन्यांचा कालावधी लागल्याचे समजत आहे.

सर्वात पहिल्यांदा धनीराम यांनी सायकलचे डिजाईन तयार केले, आणि त्यानंतर त्यांनी डिजाईनप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली. या सायकलसाठी कॅनेडियन लाकडाचा वापर करण्यात आला आहे. हे लाकून स्वस्त, हलकं आणि टिकाऊ सुद्धा असते.

दरम्यान, ही लाकडापासून तयार करण्यात आलेली सायकल २५ ते ३० किमी अंतरापर्यंत जाऊ शकते. सध्या जालंधर, दिल्ली आणि दक्षिण आफ्रिकेत या सायकलची विक्री होत आहे. विशेष म्हणजे एक खाजगी कंपनी ही लाकडी सायकल १५ हजार रुपयांना विकण्यास तयार झाली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
अनुरागवरच्या बलात्काराच्या आरोपांवर त्याची घटस्फोटीत बायको कल्की कोचलीन म्हणते..
आरोग्यमत्र्यांनी स्वतःलाच टोचून घेतली कोरोनाची पहीली लस; कारण..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.