Share

बीएसएफ जवान कॅप्टन कटप्पाने सहकाऱ्यांवरतीच केला गोळीबार, ५ जवानांचा मृत्यू, वाचा काय घडलं..

soldier-bsf

अमृतसरमधील(Amrutsar) बीएसएफच्या जवानांच्या कॅम्पमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत गोळीबार करणाऱ्या बीएसएफच्या जवानाचा देखील जखमी झाला आहे. बीएसएफ जवानांमध्ये आपापसात वाद झाल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.(Punjab Amrutsar bsf soldier random fiaring)

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर येथील खासा बीएसएफ कॅम्पमध्ये एका जवानाने अंधाधुंद गोळीबार केला. यानंतर जखमी जवानांना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात बीएसएफच्या पाच जवानांचा मृत्यू झाला असून दहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या बीएसएफचा जवान देखील यात जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफने या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव कॅप्टन कटप्पा असं आहे. अंधाधुंद गोळीबार केल्यानंतर या कॅप्टन सतप्पाने स्वतःला देखील गोळी मारून घेतली. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कॅप्टन सतप्पाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बीएसएफ जवानांमध्ये आपापसात वाद झाल्याने ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण बीएसएफ जवानाने केलेल्या गोळीबारामागील कारण अद्याप समोर आलं नाही. या प्रकरणाची सध्या बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे.

बीएसएफकडून या घटनेबाबत एक प्रेस रिलीझ देखील जारी करण्यात आलं आहे. या प्रेस रिलीझमध्ये बीएसएफने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात जखमी जवानांची चौकशी केल्यानंतर ही घटना कशामुळे घडली हे सिद्ध होईल.

अमृतसर येथील खासा बीएसएफ कॅम्पच्या मेसमध्ये ही घटना घडली आहे. सर्वजण जेवणासाठी एकत्र आले असताना सतप्पा नावाच्या जवानाने अंधाधुंद गोळीबार केला. बीएसएफचा खासा येथील हा बेस कॅम्प पाकिस्तानजवळच्या अटारी-वाघा बॉर्डरपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
वयाच्या ४५ व्या वर्षीही अमिषा पटेलचा बोल्डनेस कायम, फक्त टी शर्टवर असताना शेअर केला व्हिडीओ
मुलासोबत शाहरूखला चित्रपटात करायचे आहे काम पण येतोय ‘हा’ मोठा अडथळा
ह्रदयद्रावक! बर्फ वितळवून तहान भागवत आहेत भारतीय विद्यार्थी, सुमीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now