कोरोना नियम मोडणाऱ्यांना मध्यप्रदेशात भलतीच शिक्षा; लिहायला लावतात भगवान श्रीरामाचे नाव

सतना | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशातील अनेक राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर निर्णय घेत आहे.

लॉकडाऊन असतानाही मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर फिरत आहेत. पोलिसांकडून नियम तोडणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पोलिस काठीचा प्रसाद देत आहेत. काही पोलिस समज देऊन सोडत आहेत.

मात्र मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका पोलिस उपनिरिक्षकाने कोरोनाचे नियम तोडणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी एक अनोखी युक्ती वापरली आहे. नियम मोडणाऱ्यांना भगवान श्रीरामाचं ४-५ पानं नाव लिहायला  सांगत आहेत आणि आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यास सांगत आहेत.

जिल्ह्यातील सिंधी कॅम्प येथील बाबा दयालदास चौकात संतोष सिंह कर्तव्य बजावत  असतात. यावेळी नियम तोडणाऱ्यांना ४५ मिनिटं ते १ तास थांबवून श्रीरामाचं नाव  लिहायला सांगत आहे. यावेळी कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याचीही काळजी संतोष सिंह घेतात.

सतोष सिंह  शिक्षेच्या वेळी घरी राहून काळजी घेण्याचे आवाहन नियम तोडणाऱ्यांना करत आहेत. तसेच आपल्या आईवडिलांची सेवा करण्यास सांगत आहेत. सिंह यांनी तीन दिवसात ३० ते ४० जणांना शिक्षा दिली आहे. त्याच्यां या शिक्षेची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे.

पोलिस उपनिरिक्षक संतोष सिंह म्हणाले की, आमच्याकडे एक वही आहे आणि त्यामध्ये आणि नियम तोडणाऱ्यांना ४-५ पाने भगवान श्रीरामाचे नाव लिहायला लावतो. यामुळे त्यांना चांगली बुध्दी, ज्ञान मिळेल.

महत्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरने गुपचूप केले लग्न? भांगात कुंकू भरलेले फोटो आले समोर
कोरोना लढ्याला रिलायन्सकडून मोठे बळ; कोरोना योद्ध्यांसाठी देणार मोफत पेट्रोल डिझेल
अरे बापरे! ‘हा’ कर्मचारी आईसक्रिम टेस्ट करण्यासाठी घेतो करोडो रुपये; वाचा त्याच्याबद्दल
जुही चावला, माधूरी दिक्षितसोबत ‘या’ अभिनेत्री चित्रपटाच्या शुटींग वेळी होत्या गरोदर

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.