माझ्या हद्दीत कोणी काही आगाऊपणा केला तर त्याचे तंगडे मोडल्याशिवाय राहणार नाही

गृह विभागाने गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. 22 पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची वर्णी लागली आहे.

अखेर पुण्याला नवे पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी डॉ. अभिनव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. ते यापुवीं कोल्हापुर येथे पोलिस अधीक्षक होते. पुणे पोलिस अधीक्षक पदावर कोण येणार याकडे सर्वाचे लक्ष होते. डॉ. अभिनव देशमुख हे कडक आणि शिस्तीचे अधिकारी अशी त्यांची पोलिस दलामध्ये ओळख आहे.

“माझ्या हद्दीत जर कोणी काहीही आगाऊपणा केला, तर त्याचे तंगडे मोडल्याशिवाय राहणार नाही” असे जाहीरपणे कोल्हापूर जिल्ह्यात अवैधधंदेवाल्यांना ठणकावले होते. गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी देशमुख यांची ओळख आहे. देशमुख यांच्या कामाचा दरारा हा पोलीस कर्मचारी आणि नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांना चांगलाच आळा बसणार आहे.

यापुर्वी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे जिल्हात यशस्वी कारकीर्द पार पाडली होती. जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध दारु विक्री, बेकायदा, वाळू उपसा यासारखे अवैध धंदे करणाऱ्यांना आता आपला गाशा गुंडाळण्याची गरज आहे. कारण अवैधधंदेवाल्यांचे कर्दनकाळ समजले जाणारे डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधिक्षक संभाळला आहे.

बाते कम काम ज्यादा हे त्यांचे धोरण आहे. देशमुख यांची पत्नी डॉक्टर आहे. मी एसपीची बायको आहे हा भाव त्यांनी कधीही दाखवला नाही. आता देशमुख यांच्या येण्याणे पुण्यातील गुन्हेगारी कमी होईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.