पुणेकरांचा नादच नाय! पुण्याचा हा चार वर्षांचा चिमुकला महिन्याला कमावतो दिड लाख रूपये

एका चिमुकल्याने आपल्या कलेला अगदी लहान वयातच ओळखले आणि आज तो खुप प्रसिद्ध झाला आहे. मुर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण तंतोतंत त्याच्यावर लागू पडते. कारण त्याचे वय फक्त ४ वर्षे आहेत आणि हा चिमुकला महिन्याला दिड लाख रूपये कमावतो आहे.

वाचून धक्का बसला ना? पण हे खरे आहे. काही लोकांकडे जन्मताच कौशल्य असते. पण ते ओळखण्यास आपल्याला उशीर होतो. काही लोक ते लवकर ओळखतात. हा मुलगा पुण्याचा असून त्याचे नाव अद्वैत कोलारकर आहे.

ज्या वयात मुलांना रंग कळत नाहीत त्या वयात हा मुलगा इतके सुंदर चित्र काढतो की त्या चित्रांना प्रचंड प्रमाणात मागणी असते. हा मुलगा आपल्या कलेमध्ये इतका पारंगत आहे की त्याची चित्रे पाहून प्रत्येकजण थक्क होतो.

२ वर्षांपासून अद्वैत आपल्या आई वडिलांसह कॅनडामध्ये राहत आहे आणि तेथील तो प्रसिद्ध चित्रकार बनला आहे. त्याच्या प्रत्येक चित्राची किंमत दीड लाखांच्या आसपास आहे. दर महिन्याला त्याच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले जाते आणि मोठे मोठे कलाकार त्याची चित्र खरेदी करतात.

त्याची सर्व चित्रे गॅलेक्सी डायनासोर आणि ड्रॅगनद्वारे प्रेरीत आहेत. त्याचे सध्या खुप चाहते आहेत आणि ते चाहते त्याची चित्रे खरेदी करतात. इतक्या लहान वयात त्याने खुप प्रसिद्धी मिळवली आहे.

त्याची आई म्हणाली की तो एक वर्षांचा होता तेव्हाच त्याने रंग ओळखायला सुरूवात केली होती. २ वर्षांपासून त्याने सर्व प्रकारच्या पेंटिग्ज काढण्यास सुरूवात केली. वयाच्या ४ थ्या वर्षी त्याचे नाव महान कलाकार म्हणून ओळखले जाते. त्याच्या कलेने त्याने अनेक लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

इतक्या लहान वयात इतके मोठे नाव कमवणे सोपे काम नाही. न्युयॉर्कच्या आर्ट एक्स्पोमध्ये अद्वैतचे एक चित्र दोन हजार डॉलर्स म्हणजे सुमारे १ लाख ३० हजार रूपयांना विकले गेले आहे. त्याच्या वयातील मुलांना नीट बोलताही येत नाही आणि अद्वैत आज महिन्याला लाखो रूपये कमवत नाही.

महत्वाच्या बातम्या
व्हा इंजिनिअर! तुम्हाला आता फिजिक्स, केमिस्ट्री मॅथ्स विषय बंधनकारक नाही; AICTE चा निर्णय
शेतकऱ्यांच्या सुखासाठी वाढदिवसाला फळांचा केक कापा, सोशल मीडियावर मागणीनं धरला जोर
काय सांगता! बजरंगबलीच्या नावाने बनवण्यात आलं रेशनकार्ड, महिन्याला घेत आहेत गहू, तांदळाचा लाभ
तहसीलदार म्हणून निवड झालेल्या तरुणाला करावे लागतेय शेतमजूराचे काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.