अमिताभ बच्चनपासून ते अंबानीपर्यंत मोठमोठे सेलीब्रीटी पितात पुण्यातील या डेअरीचे दूध

महाराष्ट्रात पुण्यातील मंचर येथील भाग्यलक्ष्मी या डेअरी फार्मचे दूध अंबानी कुटुंबापासून ते अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकरसारखे मोठे सेलिब्रिटी पितात. हा फार्म २७ एकरमध्ये पसरला आहे. या फार्ममध्ये ३५०० गाई आहेत, ७५ कर्मचारी आहेत आणि १२००० ग्राहक त्यांच्याकडून दूध घेतात.

त्यांच्या दुधाची किंमत ८० रुपये प्रति लिटर आहे. फार्मचे मालक देवेंद्र शाह स्वतःला देशातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक मानतात. त्यांचा पहिला कपड्याचा व्यापार होता नंतर ते दुधाच्या व्यापारात आले.

pride of cow प्रॉडक्ट १७५ ग्राहकांपासून सुरू झाले होते. आज त्यांचे मुंबई आणि पुण्यात १२००० पेक्षा ग्राहक आहेत. त्यामध्ये बरेच मोठमोठे सेलिब्रिटीपण आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या गाई फक्त आरओ चे पाणी पितात.

जसे वातावरण असेल तसे त्यांच्या गाईंचे डाएट डॉक्टर त्यांना सांगतात. जेव्हा गाईचे दूध काढले जाते तेव्हा जेवढा वेळ गाई रोटरीमध्ये असते तोपर्यंत जर्मन मशीनने तिची मसाज केली जाते. गाईंसाठी टाकण्यात आलेले रबर मॅट दिवसातून तीन वेळा स्वच्छ होतात.

या फार्ममध्ये ५४ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाई आहेत. जुन्या ग्राहकाच्या रेफरन्सशिवाय नवीन ग्राहक ते घेत नाहीत. दरवर्षी ७ ते ८ हजार पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. दूध काढण्यापासून ते पॅकिंगपर्यंत माणसाचा हात दुधाला लागत नाही.

फार्ममध्ये येताना सर्वात आधी ते पायांवर डिसइंन्फेक्शन पावडर टाकतात. दूध काढायच्या आधी प्रत्येक गाईचे तापमान आणि वजन चेक केले जाते. आजारी असलेली गाय लगेच हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येते.

गाईचे दूध सरळ पाईपमधून साईलोजमध्ये जाते आणि मग शुद्धीकरण होऊन बाटलीत भरले जाते. एका वेळेला ५० गाईंचे दूध काढले जाते आणि त्याला फक्त ७ मिनिटे जातात.

महत्वाच्या बातम्या
‘या’ झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख; झाडाभोवती असतो २४ तास कडक पहारा
मराठा आरक्षणासाठी ठाकरे सरकारने सर्वोतपरी प्रयत्न केले, त्यांना दोष देण्यात अर्थ नाही – संभाजीराजे
…म्हणून राॅकीच्या प्रिमियरला सुनील दत्त हातात पत्नी नर्गिसचा फोटो घेऊन आले होते
मोठी बातमी! मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.