पुण्याची अंडाभुर्जी क्वीन माहिती आहे का? जिने एमबीए शिक्षणाचा उपयोग करून वाढवला व्यवसाय

अंडाभुर्जी बऱ्याच जणांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. पुण्यातील लोकही अंडाभुर्जी मोठ्या चवीने खातात. तुम्ही शक्यतो कोणत्याही अंडाभुर्जीच्या गाड्यावर गेलात तर तुम्हाला एखादा माणूस काम करताना दिसेल.

तुम्ही कधी अंडाभुर्जी क्वीनचं नाव ऐकलं आहे का? पुण्यात तिची अंडाभुर्जी खूप फेमस आहे. तिच्याकडे रोज अनेक ग्राहक अंडाभुर्जी खाण्यासाठी येत असतात. तिचे पुण्यात ३ अंडाभुर्जी सेंटर आहेत आणि प्रत्येक सेंटरवर रोज त्यांची ३०० अंडी संपतात.

आज आम्ही तिच्या संघर्षाची कहाणी सांगणार आहोत. त्या अंडाभुर्जी क्वीनचे नाव आहे रुपाली जाधव. तिने सांगितले की, मी स्टॉलवर एमबीएचा अभ्यास करायचे. अंडाभुर्जी खाणारे ग्राहक माझे कौतुक करायचे आणि सांगायचे अभ्यास चालू ठेव.

स्टॉलवर येणाऱ्या लोकांमुळे मला एमबीए पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. आज आमच्या सेंटरवर दिवसाला ३०० अंडी संपतात. ग्राहकांची आमच्यावर खूप कृपा आहे. एमबीए शिकून एखाद्या मोठ्या कंपनीत कामाला लागण्यापेक्षा तिने तिने मामाचा अंडाभुर्जीचा व्यवसाय वाढवला.

तिने आपल्या शिक्षणाच्या जोरावर पुण्यात तीन अंडाभुर्जी सेंटर उभारले आहेत. रुपलीचे मामा पुण्यात अंडाभुर्जी गाडी चालवायचे. २००८ साली तिने आपल्या मामाला हातभार लावण्यास सुरुवात केली.

पुढे काही दिवसांनी म्हणजे २०१३ मध्ये तिच्या मामांचे निधन झाले आणि तिने स्वतः अंडाभुर्जी गाडा चालवला. तिला तिच्या आईची आणि आजी आजोबांची साथ मिळाली. हा व्यवसाय करत असताना तिने एमबीएची डिग्री मिळवली.

तिच्याकडे अनुभव तर होताच पण शिक्षणाच्या जोरावर तिने डेक्कन कॉर्नर येथे शिवमल्हार अंडाभुर्जी सेंटर सुरू केले. त्यांच्या अंडाभुर्जीची चवच खास होती त्यामुळे सगळीकडे त्यांच्या अंडाभुर्जीची चर्चा होऊ लागली.

लांब लांबवरून लोक अंडाभुर्जी खायला येऊ लागले. त्यानंतर तिने सेंट्रल मॉलजवळ आणि कर्वेनगर येथे नवीन शाखा उभारली. आता रुपलीकडे फ्रेंचायजीची मागणी होत आहे. कारण तिच्या हातची अंडाभुर्जी आहेच इतकी चवदार की तुम्हीही एकदा खाल तर सारखे सारखे तिथे जाल.

जर तुम्हाला दुसरीकडे कुठे शिवमल्हार अंडाभुर्जी दुसरीकडे कुठे खायला मिळाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण पुण्यातून गोष्टी फेमस होण्यास वेळ लागत नाही. कारण पुण्यातील बऱ्याच गोष्टी बाहेरच्या राज्यात फेमस आहेत. आणि रूपालीची अंडाभुर्जीही काही दिवसांत सगळीकडे फेमस होईल यात काही शंकाच नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.