VIDEO: तरुणाने घेतली ३५ फुट उंच असलेल्या होर्डिंगवरुन उडी, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे परिसरात आज दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात स्टेशनजवळ आज एका मनोरुग्णाने ३५ फुटावरील जाहिरात फलकावरुन उडी मारली आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे.

उडी मारल्यानंतर खाली जमलेल्या लोकांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे..

पुणे रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकादरम्यान काही ३५ फुटी फलक आहे. इतक्या उंच असलेल्या तो मनोरुग्ण चढला होता. हे पाहून नागरीकांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने अग्निशमन दल तिथे पोहचले.

अग्निशमन दलानेही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तो मनोरुग्ण थांबण्यात तयार नव्हता. त्यानंतर त्याने थेट ३५ फुटांवरुन उडी मारली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

धक्कादायक हा गोष्ट म्हणजे हा ३५ फुट उंचीवर ही जाहिरात लावली होती तितक्या उंचीवरुन त्याने उडी मारली आहे. जेव्हा ती व्यक्ती उडी मारण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा अग्निशमन दलही दाखल झाले. त्यानंतर दलातील काही कर्मचारी त्याला थांबवण्यासाठी वर चढू लागले.

त्यानंतर कोणचंही ऐकून न घेता त्या रुग्णाला उडी घेतली आहे. या उडीमुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल कररण्यात आले आहे. अशात तिथे असलेल्या एका नागरीकाने हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या-

आईनं अखेरचा श्वास घेतला, कळलंच नाही; ‘तो’ प्रसंग सांगताना जॅकी श्रॉफ ढसाढसा रडला
पीएम केअर्स फंड भारत सरकारचा निधी नाही, त्याची माहिती RTI अंतर्गत येत नाही- मोदी सरकार
पुरूषांपेक्षा महिलेसोबत इंटीमेट सीन करणे सोपे आहे, मल्लिका शेरावतचे या अभिनेत्रीसोबत इंटीमेट सीन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.