Homeताज्या बातम्याचालु बसमध्ये चालकाला अचानक आली फिट, हिंमत दाखवत महीलेने हाती घेतले स्टेअरींग;...

चालु बसमध्ये चालकाला अचानक आली फिट, हिंमत दाखवत महीलेने हाती घेतले स्टेअरींग; वाचवला सर्वांचा जीव

शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली याठिकाणी एक हैराण करणारी घटना घडली आहे. एक महिलांचा ग्रुप फिरायला गेला असताना त्यांच्या बस ड्रायव्हरला अचानक फिट आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण यावेळी प्रसंगावधान दावत ट्रिपमधल्या महिलेनेच बस चालवत चालकाचा जीव वाचवला आहे.

महिल्या ज्या बसने पर्यटनासाठी गेल्या होत्या, त्याच बसच्या चालकाला फिट आली होती. त्यामुळे बसमधल्या सर्व महिला घाबरल्या पण तिथे असलेल्या योगिता सातव यांनी त्यांना धीर दिला आणि बसचे स्टेअरिंग हातात घेत बस चालवली. त्यामुळे चालक वेळेत रुग्णालयात पोहचला आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले.

तसेच पर्यटनासाठी आलेल्या सर्व महिलाही सुरक्षित आहे. योगिता सातव वाघालोच्या रहिवासी आहे. योगिता यांचा बस चालवताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच चालकाचा जीव वाचवल्यामुळे त्यांचे कौतूकही केले जात आहे.

वाघोली गावच्या महिला सरपंच जयश्री सातव यांनी आपल्या सहकारी महिलांसोबत योगिता सातव यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला आहे आणि कौतूक केले आहे. यावेळी जयश्री सातव म्हणाल्या की, चारचाकी वाहने बहुतेक महिला चालवतात, पण परिस्थिती गंभीर असताना बस चालवणारी तू वाघोलीतील पहिली महिला आहेस, याबद्दल आम्हाला तुझा अभिमान आहे.

पुण्याजवळील वाघोली येथील रहिवासी असणाऱ्या आशा वाघमारे आणि त्यांच्या काही मैत्रिणी शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे फिरायला गेल्या होत्या. फिरत असताना त्यांच्या बसच्या ड्रायव्हरला अचानक फिट आहे. ते खाली पडले त्यांचे डोळे पांढरे झाले. तसेच त्यांचे हातपाय वाकडे होऊ लागले. हे पाहून सर्वच महिला घाबरुन गेल्या.

अचानक असा प्रसंग घडल्यामुळे कोणालाच काही सुचत नव्हते. अशा परिस्थितीत संबंधित बसूमधून प्रवास करणाऱ्या योगिता सातव यांनी बसचे स्टेअरिंग हातात घेतले आणि बस चालवली. तसेच चालकाला तातडीने रुग्णालयात पोहचवले आणि सर्व महिलांना सुरक्षित घरी पोहचवले. त्यामुळे बसमधल्या महिलांनी त्यांचे आभार मानले आहे.

महत्वाच्या बातम्या-
चालु बसमध्ये चालकाला अचानक आली फिट, हिंमत दाखवत महीलेने हाती घेतले स्टेअरींग; वाचवला सर्वांचा जीव
८३०० किमीचा प्रवास, जंगलात लपला, पार्कमध्ये रात्र काढल्या; आज तोच बनला सर्वोत्तम गोलंदाज
दोन्ही हातानं गोलंदाजी करणाऱ्या १९ वर्षाच्या पोरानं क्रिकेटमधील दुजाभाव आणला समोर; पहा नक्की काय घडलं