सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या(Pune University) प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित( Shantishri Dhulipudi Pandit) यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या( Education Ministry) अधिकाऱ्यांनी या संदर्भात आज माहिती दिली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या इतिहासात या घटनेची नोंद होणार आहे.(Pune university professor shantishri selected as jnu vice chancellor)
शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शांतीश्री धुलीपुडी पंडित या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू असणार आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी असणार आहे. डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित या पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापिका होत्या. त्यांचा कार्यकाळ पुढील पाच वर्षांचा असणार आहे. आतापर्यंत जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये १२ पुरुष कुलगुरू होते.
प्राध्यापिका डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून तत्त्वज्ञानात मास्टर्स आणि पीएचडी पदवी घेतली आहे. १९८८ मध्ये गोवा विद्यापीठातून त्यांनी आपल्या अध्यापनाची सुरुवात केली. १९९३ मध्ये त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. यापूर्वी प्राध्यापक एम. जगदीश कुमार हे जेएनयू विद्यापीठाचे कुलगुरू होते.
गेल्या वर्षी प्राध्यापक एम. जगदीश कुमार यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर प्राध्यापक एम. जगदीश कुमार जेएनयू विद्यापीठात कार्यवाहक कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडत होते. प्राध्यापक एम. जगदीश कुमार यांची आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित यांचा जन्म १५ जुलै १९६२ रोजी रशियात झाला. प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित यांचे आई-वडील दोघेही शैक्षणिक पार्श्वभूमीचे होते. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांचे वडील धुलीपुडी अंजनेयलू पत्रकार आणि लेखक होते. शांतीश्री यांची आई मुलामुदी आदिलक्ष्मी ह्या USSR रशियामध्ये तामिळ आणि तेलगूच्या प्राध्यापिका होत्या.
प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजकारण विषयाच्या प्राध्यापक आणि एमफिल, पीएचडी मार्गदर्शक आहेत. या व्यतिरिक्त प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन स्टडीज विभागामध्ये मास मिडीया ऑडियन्स, राजकारण आणि सवांद यांसारखे विषय देखील शिकवतात.
महत्वाच्या बातम्या :-
ह्युंदाईच्या ‘त्या’ ट्विटमुळे भारतीय लोक संतापले, होतेय भारतातून हकालपट्टी करण्याची मागणी
VIDEO: ‘थेरगाव क्वीन’ने पिंपरी पोलिसांना दिलं खुलं चॅलेंज; “ढगात आहे आपण, खालनं किती बी दगडं मारा”
लतादीदींचा शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल, त्यांची अवस्था पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा