धक्कादायक! पुण्यातील १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या, दहावीला मिळाले होते ९५ टक्के

पुण्यातील प्रसिद्ध नांदेड सिटीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारावीत शिकणाऱ्या एका मुलीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. या मृत्युचे अद्याप कारण समजलेले नाही.

आत्महत्या केलेल्या मुलीला दहावीला ९५ टक्के मिळाले होते. सध्या ती बारावीमध्ये शिकत होती. या मुलीचे नाव श्रीया पुरंदरे असे आहे. नांदेड सिटीत राहणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडर श्रीयाने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेत आपले आयुष्य संपवले आहे.

श्रीयाने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास तिने आत्महत्या केली आहे. सकाळी गॅलरीत व्यायाम करणाऱ्या अभिजीत देशमुख यांना काही तरी खाली पडण्याचा जोरात आवाज आला.

त्यानंतर अभिजीत यांनी खाली बघितले असता त्यांना धक्काच बसला. त्यांना श्रीया खाली पडलेली दिसून आली. त्यानंतर अभिजीत यांनी तातडीने हवेली पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली आहे.

श्रीया ही नॅशनल हॉर्स रायडर होती. श्रीया ही अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील सदस्यही हसून खेळून राहत होते. श्रीयाच्या वडिलांची हॉर्स रायडिंगची अकॅडमी आहे. त्यामुळे तिला लहानपणापासून हॉर्स रायडिंगची हौस होती.

तसेच श्रीयाने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर श्रीयाने हॉर्स रायडिंगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली होती. सर्व काही चांगले असताना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलेले आहे. त्यामुळे श्रीयाने हे का केले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पोलिस याबाबत आता चौकशी करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांचा लग्नाबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या लग्न करणार, पण…
“मोदी थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात पॉवर, शिवसेनेत माज असायलाच हवा”
कुंपनच शेत खातय! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन, वाळू उपसा करणाऱ्यांना करत होता मदत..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.