Share

परराज्यातून महिला आणून टुरिस्ट गाडीतून अशाप्रकारे चालू होता वेश्याव्यवसाय, पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

Sex-Racket.

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पर्यटनाच्या नावाखाली परराज्यातील महिलांना आणून टुरिस्ट गाडीतून वेश्याव्यवसाय चालवला जात होता. पुण्यातील येरवडा(Yervada) आणि विमाननगर(Vimannagar) परिसरात हा प्रकार सुरु होता. पण पुणे पोलसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.(pune-sex-racket-reveled-pune-police)

या प्रकरणात पोलिसांनी दोन दलालांना अटक केली आहे. कुलदीप मोहनप्रसाद महतो ( वय- २६ ) आणि जयशंकर प्रसाद रमेश साव ( वय- २० ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी विमाननगर आणि येरवडा भागात टुरिस्ट गाडीतून फिरायचे आणि त्याद्वारे वेश्याव्यवसायासाठी महिला पुरविण्याचे काम करायचे.

सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी या माहितीची खातरजमा केली. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींचे नंबर मिळविले. पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी बनावट ग्राहकाला विमाननगरमधील इस्ट फिल्ड हॉटेलमध्ये दोन रूम बुक करायला सांगितले.

त्यानुसार बनावट ग्राहकाने इस्ट फिल्ड हॉटेलमध्ये दोन रूम बुक केल्या. यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, उपनिरीक्षक श्रीधर खडके, हवालदार राजेंद्र कुमावत, राजश्री मोहिते, मनीषा पुकाळे, अण्णा माने, हणमंत कांबळे, इरफान पठाण , पुष्पेंद्र चव्हाण आणि प्रमोद मोहिते यांनी इस्ट फिल्ड हॉटेलजवळ सापळा रचला.

त्यावेळी आरोपींची टुरिस्ट गाडी इस्ट फिल्ड हॉटेलजवळ आली. त्यानंतर पोलिसांनी टुरिस्ट गाडीमधून कुलदीप आणि जयशंकर या दोन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका देखील केली. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाकडून आरोपींची चौकशी करण्यात आली.

आरोपी कुलदीप आणि जयशंकर पुण्यामध्ये टुरिस्ट गाडी चालवत असल्याचे भासवून परराज्यातील पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे. पुणे पोलीस सध्या या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
युक्रेनमधील प्रत्येक भारतीयाची सुरक्षित घरवापसी करण्यासाठी.., ऑपरेशन गंगावर मोदींचे मोठे वक्तव्य
स्वत: प्रेमविवाह केला आणि बहिणीने आपला वर निवडला तर अक्षयने तोडले बहिणीशी संबंध
दु:खद! आईने एकुलता एक लेक गमावला, युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यु

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now