मंगळवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात खेळाडू ऋतुराज गायकवाडने तुफान फलंदाजी केली आहे. टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने(Ruturaj Gaikwad) दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली आहे. ऋतुराज गायकवाडने एनरिक नॉर्टच्या एका षटकात तब्बल पाच चौकार मारले आहेत. (pune ruturaj gaikwad batting five fours in five balls)
तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील भारताचा हा पहिलाच विजय आहे. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने १७९ धावा केल्या होत्या. यामध्ये टीम इंडियाचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याने झंझावाती खेळी केली.
यावेळी टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने ३५ चेंडूत १६२ च्या स्ट्राईक रेटने ५७ धावा केल्या होत्या. या खेळीत ऋतुराज गायकवाडने पाच चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टच्या एक षटकात टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने तब्बल २० धावा केल्या आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1536727526659137536?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1536727526659137536%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=about%3Asrcdoc
यावेळी फलंदाज ऋतुराज गायकवाडने एनरिक नॉर्टच्या षटकात पाच चौकार मारले आहेत. भारतीय खेळाडू केएल राहुलला या मालिकेपूर्वी दुखापत झाली होती. त्यामुळे केएल राहुलच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली. या संधीचे सोने करत ऋतुराज गायकवाडने उत्तम फलंदाजी केली आहे आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.
यापूर्वी झालेल्या दोन टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने २३ चेंडूत १५ धावांची खेळी केली. तर कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने ४ चेंडूत १ धाव केली. पण विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने ५७ धावांची खेळी केली.
ऋतुराज गायकवाडने मागील वर्षी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत भारताकडून सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
साऊथच्या ‘या’ स्टार अभिनेत्याने बाॅलीवूडला लाथ मारून स्विकारली मराठी चित्रपटाची आॅफर
IPL ला जगभरात गाजवण्यासाठी जय शहांनी केला मोठा प्लॅन; म्हणाले, अडीच महिन्यांसाठी…
काश्मिरी पंडितांचे खून अन् गाय तस्करीवेळचं माॅब लिंचिंग यात काहीही फरक नाही; साई पल्लवीचे बेधडक वक्तव्य