रुग्णसंख्या कमी झाल्याने पुणेकरांना दिलासा! नवीन नियमानुसार मिळणार सूट, जाणून घ्या..

पुणे । गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा राज्यात वाढत असताना आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.

देशभरात रुग्ण वाढत असताना पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. यामुळे पुण्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. तसेच विकेंड लॉकडाऊनची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र आता रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे पुण्यात काही प्रमाणावर लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे.

तसेच विकेंड लॉकडाउन देखील कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पुण्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे. आजपासून शनिवार रविवारचे पूर्ण लॉकडाऊनचे आदेश शिथिल करण्यात आले आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे नवे आदेश जारी केले आहेत. यामुळे शहरात दर आठवड्याच्या शनिवार, रविवारीही बंदी असलेल्या अत्यावश्यक सेवा यापुढे मर्यादित कालावधीकरिता सुरू ठेवता येणार आहेत. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

यामध्ये आरोग्य सेवांसह किराणा, भाजीपाला, फळविक्री, डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने, मटन, चिकन, अंडी, मासे विक्री दुकानांसह यांचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये हे सुरू राहणार आहे.

तसेच सिनेमागृह, नाट्यगृह, ओडिटोरिम, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, जिम, जलतरण तलाव, क्रीडा संकुल आदी बंद रहाणार आहे. स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केश कर्तनालाय हे देखील बंद राहणार आहे. सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, आंदोलने करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तसेच सर्व शाळा महाविद्यालये बंद राहणार आहेत. याबाबत पालिकेने नियमावली जारी केली आहे. मे महिन्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काही दिवसात हळूहळू यामध्ये अजून सूट मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

कोरोनाच्या संकटात देश कोण चांगलं सांभाळू शकतं नरेंद्र मोदी कि राहूल गांधी ? जनता म्हणाली…

करिअर वाचवण्यासाठी स्वत: च्याच चित्रपटाचे तिकीट खरेदी करत होता ‘हा’ अभिनेता

सुशांतच्या पुण्यातिथी आधी अली गोनीने शेअर केलेली भावुक पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.