पुजा चव्हाण प्रकरण, भाजपच्या ‘या’ नगरसेवकाला पुणे पोलिसांनी बजावली नोटिस, म्हणाले…

पुणे | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. पुजाच्या आत्महत्येमागे शिवसेना मंत्री संजय राठोड असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अखेर राठोड यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अशातच पुजा चव्हाणच्या आत्महत्ये प्रकरणी भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे अडचणीत आले आहेत. घोगरे यांना पुणे पोलिसांनी नोटिस पाठवली आहे. या नोटिसीमध्ये ‘पुजा चव्हाण यांचा लॅपटॉप आणून द्यावा’ अशी मागणी पोलिसांनी केली आहे.

दोन दिवसांपुर्वी शिवसेनेच्या बीड जिल्ह्याच्या महिला प्रमुख संगीता चव्हाण यांनी नगरसेवक घोगरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले की धनराज घोगरे यांनी पुजाच्या घरात घुसून तिचा मोबाईल आणि लॅपटॉप चोरला आहे आणि त्यांनीच फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल केल्या आहेत.

दरम्यान घोगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपशी माझा काहीही संबंध नाही. मी घटना घडली त्यादिवशी लोकप्रतिनिधीच्या नात्याने तिथे गेलो होतो. मी पुजाला उचलून रिक्षात ठेवलं होतं असं म्हटलं आहे.

पुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर भाजपकडून पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता या प्रकरणात भाजपच्या नगरसेवकाच नाव आल्याने भाजप काय भूमिका घेते हे पाहणं तितकच महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
भाजपा मंत्र्याने घरीच घेतली कोरोना लस; केला अजब खुलासा
मनसुख हिरेन प्रकरण, विधानसभेत अनिल देशमुख आणि फडणवीसांमध्ये जुंपली, म्हणाले…
‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या गाडीला अचानक मालवाहतूक गाडी येऊन धडकली अन्…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.