गजानन मारणेसाठी धडकी भरवणारी बातमी! पुण्यातील साम्राज्य उद्धवस्त करण्याची पोलीस आयुक्तांची घोषणा

मुंबई : टोळीयुध्दातून विरोधी गटातील दोघांचा खू.न केल्याप्रकरणी गेल्या सहा वर्षापासून मुंबईतील तळोजा जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली. त्याच्या समर्थकांनी तळोजा जेल ते पुणे तब्बल दिडशे किलोमीटर गाड्यांची रॅली काढली.

याबाबत गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे गजानन मारणेला दणका देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. गुंड गजा मारणेचं गुन्हेगारी साम्राज्य समूळ उद्धवस्त करणार, असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

पोलिसांनी असे आक्रमक रूप धारण केल्यामुळे मारणे याच्या मनात चांगलीच धडकी भरली असणार, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. सोमवारी तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गजानन मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढली होती. शेकडो वाहनांचा ताफा या मिरवणुकीत सहभागी झाला होता.

तसेच तळोजाहून पुण्यात येताना वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियम पाळायला सांगण्यासाठी आलेल्या पोलिसांना गजा मारणे आणि त्याच्या टोळीच्या सदस्यांनी धक्काबुक्की केली होती. त्याचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात दाखल होता. मात्र गजानन मारणे हा अटकेच्या भीतीने फरार झाल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. प्रसिद्धीपत्रक काढुन पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सोलापूरच्या तरुणाची अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनोखी ट्रॅक्टर सेवा; वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
शालूचा हॉट अंदाज; सोशल मीडियावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ…
कार्यकर्त्यांचा चांदीच्या चपला, पॅशन बाईक देऊन केला सन्मान; पडळकरांच्या डोळ्यात अश्रू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.