भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; अरुण लाड यांचा विक्रमी मतांनी विजय

मुंबई | पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या गडाला सुरुंग लागला आहे. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पुणे पदवीधर मतदार संघात पहायला मिळाली. यामध्येच महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का देत पुणे मतदारसंघ काबिज केला आहे.

महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३३२१ मतं, ४८  हजार ८२४ मतांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार
पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला होता.

महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३३२१ मतं, ४८  हजार ८२४ मतांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

मराठवाडा पदवीधरमध्ये सतीश चव्हाण विजयी…
मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या
पुणे पदवीधरमध्ये भाजपला भगदाड; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी जोरात
रेखा जरे हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटलांचे प्रचंड धक्कादायक खुलासे
पुणे ते नागपूर भाजप भूईसपाट! विधान परिषदेत महाविकासआघाडीचा डंका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.