MNS Traffic March : ठाणे (Thane) शहरातील वाहतुकीची स्थिती गंभीर बनत चालली आहे. जड आणि अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक, तसेच प्रशासनाची निष्क्रियता पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पुन्हा एकदा ठाणे महापालिकेसमोर आक्रमक भूमिका घेत आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी मनसेकडून (MNS) ठाण्यात ट्रॅफिक मोर्चा (Traffic March Morcha) काढण्यात येणार असून, हा मोर्चा मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
प्रशासनाला स्पष्ट इशारा
सोमवारी (दि. 15) झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घोडबंदर (Ghodbandar) रस्त्यावर रात्री 12 वाजेपर्यंत जड वाहने सोडण्याचे आदेश दिले. या आदेशाचे पालन होत नसल्याने मनसेने थेट प्रशासनाला इशारा दिला आहे. अविनाश जाधव (Avinash Jadhav) म्हणाले, “जर ट्रक रात्री 12 च्या आत रस्त्यावर दिसले, तर मनसे कार्यकर्ते त्या वाहनांना फोडून टाकतील.”
उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा फटका कुणाला?
अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “उपमुख्यमंत्र्यांचा आदेश पाळत नाही, तर कोणाचा पाळणार? सरकार प्रशासन चालवत आहे की राजकीय नेते? परिवहन मंत्री यांनी देखील आदेश दिले होते, पण दुसऱ्या दिवशीही अवजड वाहने सुरू होती. आज कारवाई होणे आवश्यक आहे. आदेश पाळला जात नाही, काही अधिकारी निलंबित केले पाहिजेत.”
राज ठाकरेंचा आवाज म्हणून ठाणेकरांसमोर
अविनाश जाधव (Avinash Jadhav) पुढे म्हणाले, “आम्ही ट्रॅफिक मोर्चा काढत आहोत, जे ठाण्याच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रित करेल. हा मोर्चा लगेच क्रांती करणार नाही; हा सर्व सामान्य नागरिकांचा आक्रोश आहे. मला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजाचा प्रतिनिधीत्व करून मी ठाणेकरांसमोर उभा राहणार आहे. लवकरच ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढणार.”
नियमांचे पालन का होत नाही?
ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी (Thane Traffic Police) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने अवजड वाहने नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अविनाश जाधव (Avinash Jadhav) म्हणाले, “जर लक्ष नाही, तर सीसीटीव्हीद्वारे वसुली करावी. शिस्त लागू करण्यासाठी हे उपाय आवश्यक आहेत. परंतु, एकाचवेळी चार लेन वाहने भरून राहतात, त्यावर कारवाई का होत नाही? सरकार नियम पाळत का नाही? नियम फक्त आम्ही पाळणार?”