हातोडा पॅटर्न! पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांचा जिममधील व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

पुणे । वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेले पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे जिममध्ये वजन उचलतानाचा व्हिडीओ खुद्द वसंत मोरे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

यामध्ये वजन उचलताना ते दिसत आहेत. वसंत मोरे हे मनसेचे आक्रमक नेते मानले जातात. कधी ते अधिकाऱ्याची गाडी फोडतात, तर कधी ते गाडीला लावलेला जॅमर फोडतात. यामुळे ते सतत चर्चेत असतात. कोरोना काळात त्यांनी मोठी मदत केली होती.

आता त्यांनी जिममधल्या या व्हिडिओला मी सहजा सहजी हार मानणारा नाही, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे. असे कॅप्शन दिले आहे. वसंत मोरेंच्या व्यायामाच्या व्हिडीओवर समर्थकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. यामुळे त्यांची चर्चा सुरू आहे.

अवघ्या दोन तासांतच या व्हिडीओला अनेकांनी लाईक केले आहे. यावर अनेक कमेंट्स देखील येत आहेत. वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे मोठे नेते आहेत. राज ठाकरेंच्या ते जवळचे मानले जातात. अनेकांच्या मदतीसाठी ते धावून जातात. कोरोना काळात त्यांनी अनेकांना मोठी मदत केली होती.

कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने वसंत मोरे यांनी पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. वसंत मोरे भेटायला येणार आहेत, असे समजताच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचे बिलही माफ झाले होते.

ताज्या बातम्या

हनी सिंगच्या बायकोने त्याच्यावर केले खळबळजनक आरोप, म्हणाली, ब्राऊन रंग दे या गाण्यातील अभिनेत्रीसोबत..

‘जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील’ असे म्हणत बंदुक घेऊन काढला व्हिडीओ, पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन

बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ मोठ्या कंपनीत १० हजार पदांची भरती, विदेशात जाण्याची संधी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.