पुणे म्हाडाने दिली गोड बातमी; वाचा..

स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी सरकार विविध योजना राबवून घरे देण्याचा प्रयत्न करत असते. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे यांच्याकडून दिनांक २२/०१/२०२१ रोजी सहावी म्हाडाच्या घरांची ऑनलाईन सोडत झाली होती. या सोडतीमध्ये घर मिळालेल्या अर्जदारांचे अर्ज पात्रतेचे शिबीर एकाच ठिकानी घेण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय ठाकुर यांनी दिली आहे.

दिनांक ८/०२/२०२१ ते 1५/०२/२०२१ या कालावधीमध्ये गृहनिर्माण मंडळाच्या गृहनिर्माण भवन, आगरकर नगर पुणे येथे शिबीराचे आयोजन केले आहे. याची माहिती सर्व अर्जदारांना ईमेलद्वारे देण्यात आली आहे. अर्जदारांनी ईमेलमध्ये सांगितलेली रक्कम भरून त्याची पावती आणि कागदपत्रे घेऊन दिनांक ८/०२/२०२१ ते 1५/०२/२०२१ या दिवसांमध्ये म्हाडाच्या कार्यालयात उपस्थित राहावे. असं सागंण्यात आलं आहे.

सदर शिबीरामध्ये संकेत क्रमांकाप्रमाणे तपासणी पथकं तयार केली आहेत. अर्जदारांनी आपापल्या संकेत क्रमांकाच्या तपासणी पथकासमोर आपली कागदपत्रे आणि रक्कम भरलेली पावती दाखवायची आहे. कागदपत्रे तपासणीनंतर पात्र झालेल्यांना २०% स्कीममधील अर्जदारांना १५ फेब्रूवारीनंतर ईमेलद्वारे देकारपत्र देण्यात येणार आहे.

अर्जदारांची संख्या पाहता गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने मुख्याधिकारी श्री. नितीन माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ८ तपास पथकांची नेमणूक केली आहे. पुण्यात प्रथमच म्हाडाच्या घरांसाठी मंडळाकडून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. घर मिळालेल्या अर्जदारांची गैरसोय होऊ नये म्हणून एकाच ठिकाणी कागदपत्रांची तपासणी होणार आहे. याचा सर्व अर्जदारांनी लाभ घ्यावा. असं आव्हान म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय ठाकुर यांनी केले आहे.
म्हत्त्वाच्या बातम्या-
‘आंदोलनातील २०० शेतकऱ्यांना अटक, पण दीप सिद्धू अजूनही मोकाट का?’
मारिया माफ कर, तू बरोबर होतीस; ‘आता आम्हीही सचिनला ओळखत नाही’
“त्यावेळी तुम्हाला कुणी थांबवलं होतं का?”; अजित पवारांचा सेलिब्रिटींना सवाल
हनिमूननंतर नवरा बायकोमध्ये भांडणे का होतात? जाणून घ्या यामागची कारणे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.