पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी पुणे पुर्णपणे बंद, कठोर निर्बंध लावण्याचा अजितदादांचा आदेश

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसून येत आहे. पण अजूनही कोरोनाचा पुर्णपणे धोका टळलेला नाही. पुण्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. असे असतानाच गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर काही निर्बंध लावण्यात आले आहे.

अशातच पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनादिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार आहे, असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी फक्त अत्यावश्य सेवेची दुकानेच सुरु ठेवण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा पादुर्भाव वाढू नये यासाठी पुण्यातील निर्बंध विसर्जनाच्या दिवशी कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी नागरीक मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती गर्दीही धोकादायक आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसारही होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे आणि आसपासच्या परिसरात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे अंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यात फक्त अत्यावश्य सेवेतील दुकाने सुरु राहणार आहे. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण आता कमी होत चालले आहे, तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर २ ऑक्टोबरला नवा निर्णय घेऊ, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अजितदादा तब्बल १३ नगरसेवक फोडत भाजपला देणार मोठा धक्का; स्वत:च केले जाहीर
…म्हणून चंद्रकांत दादा म्हणताय त्यांना माजी मंत्री म्हणू नका; संजय राऊतांनी सांगितली ‘आतली’ गोष्ट
शाॅर्ट्स घातल्याने तरुणीला पेपरला बसू दिले नाही, शेवटी पडदा गुंडाळून द्यावा लागला पेपर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.