Share

Pune Husband-Wife Death After Liver Transplant : पुण्यात पत्नीकडून पतीला लिव्हर दान; शस्त्रक्रियेनंतर फक्त आठ दिवसांत दोघांचा मृत्यू, नातेवाईक हादरले

Pune Husband-Wife Death After Liver Transplant :  पुण्यातील डेक्कन परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बापू बाळकृष्ण कोमकर (Bapu Balkrishna Komkar) आणि कामिनी बापू कोमकर (Kamini Bapu Komkar) या दांपत्यावर झालेल्या लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयात घडली असून, नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.

पतीला पत्नीने दान केले लिव्हर

पती बापू कोमकर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पत्नी कामिनी कोमकर यांनी स्वतःचं लिव्हर दान केलं. शस्त्रक्रिया मागील आठवड्यात बुधवारी झाली, मात्र फक्त दोन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी बापू कोमकर यांचा मृत्यू झाला. आठ दिवसांनी शनिवारी कामिनी कोमकर यांनाही मृत्यू झाला.

रुग्णालयावरील आरोप

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर रुग्णालय आणि डॉक्टरांनी हलगर्जीपणा दाखवला. शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीला आई-वडील ठीक होते, खात-पित होते, पण अचानक आठ दिवसांनी कामिनी कोमकर यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांना त्याचा कारण सांगण्यात आले नाही. यामुळे रुग्णालय आणि डॉक्टरांवर गंभीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आर्थिक ताण आणि भरलेली रक्कम

कोमकर कुटुंबाने रुग्णालयात पैसे भरण्यासाठी कर्ज घेतले होते. डॉक्टरांनी सुरक्षित शस्त्रक्रियेची हमी दिल्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया केली, मात्र दुर्दैवी घटनेमुळे दोघांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे कोमकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. आई-वडील गेल्याने त्यांच्या मुलावर मोठा ताण पडला आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, या घटनेमुळे न्यायालयीन कारवाईसह रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि डॉक्टरांवर जबाबदारी ठरवण्याची आवश्यकता आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now