Share

Pune Crime News: पुण्यात 25 वर्षीय तरूणीवर अत्याचार; आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगून तोंडावर केमिकल स्प्रे मारला अन्…

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरातील कोंढवा (Kondhwa) परिसरात बुधवारी रात्री एका धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका २५ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार (sexual assault) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आरोपीने घेतले कुरिअर बॉयचा सोंग 

घटना २ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पीडित तरुणी ही मूळची अकोला (Akola) जिल्ह्यातील असून सध्या पुण्यात कोंढवा येथील एका उच्चभ्रू आणि गार्डेड सोसायटीत आपल्या भावासोबत राहते. ती कल्याणी नगर (Kalyani Nagar – Pune) भागातील एका खासगी आयटी कंपनीमध्ये काम करते.

घटनेच्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने कुरिअर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्याने पीडितेच्या दारावर येऊन “बँकेचं कुरिअर आहे” असे सांगितले. तरुणीने हे कुरिअर आपले नसल्याचे स्पष्ट केले, मात्र आरोपीने “सही करावी लागेल” असा आग्रह धरला.

जेव्हा तरुणीने सेफ्टी डोअर (safety door) उघडले, तेव्हा आरोपीने तिच्या तोंडावर केमिकल स्प्रे (chemical spray) मारला. स्प्रेमुळे बेशुद्ध झालेल्या तरुणीवर आरोपीने जबरदस्ती केली आणि बलात्कार केला.

पोलिसांकडून चौकशीला गती

घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिस स्टेशन (Kondhwa Police Station) व पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV footage) तपासण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी १० विशेष तपास पथकं (special investigation teams) तयार करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now