Share

सिद्धू मुसेवाला प्रकरणात समोर आलं ‘पुणे कनेक्शन’, ८ शुटर्सची ओळख पटली, वाचून धक्का बसेल

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते ​​सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला(Sidhu Musewala) यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस सध्या जोरदार तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सहभागी झालेल्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे. (Pune Connection’ comes to the fore in Sidhu Musewala case)

या आठ पैकी एक शूटरला पोलिसांनी पंजाबमधून अटक केली आहे. आता पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन देखील समोर आले आहे. महाराष्ट्रातील पुण्यामधील दोन शूटर्सचा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी या दोन शूटर्सची नावे आहेत.

सध्या पोलिसांकडून दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधून सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येत सहभागी असलेल्या शूटर्सना अटक केली आहे. यामध्ये सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये राजस्थानमधील तीन, पंजाबमधील तीन आणि महाराष्ट्रातील दोन शूटर्सचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील पुण्यातील दोन शूटर्सचा समावेश आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ या दोन शूटर्सचा सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. बाणखेले खून प्रकरणात दोघेही मोक्काचे फरार आरोपी आहेत.

संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ दोघेही पंजाबमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात एकूण आठ शूटर्सचा सहभाग आहे. त्यातील मनप्रीत सिंग मन्नू या आरोपीला पोलिसांनी उत्तराखंडमधून ताब्यात घेतले आहे. मनप्रीत सिंग मन्नूवर शूटर्सना वाहने पुरवल्याचा आरोप आहे.

याशिवाय पंजाबमधील जगरुत सिंग रूपा आणि हरकमल उर्फ रानू यांचा सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. या हत्या प्रकरणात हरियाणातील प्रियव्रत उर्फ फौजी आणि मनजीत उर्फ भोलू यांचा देखील सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. तसेच महाराष्ट्रातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांच्यावर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा आरोप आहे. याव्यतिरिक्त राजस्थानमधील सुभाष भनोडा यांचा देखील हत्या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘अरंगेत्रम’ कार्यक्रमात थिरकली अंबानींची होणारी सुन, नृत्य पाहून सेलिब्रीटीही झाले घायाळ, पहा व्हिडीओ
उडत्या विमानात दोन भावांनी एकमेकांवर केली लघवी, त्रासलेल्या पायलटनं उचललं धक्कादायक पाऊल
खासदार असूनही IPL मध्ये काम का करतोय? संतापलेला गंभीर म्हणाला, ५००० लोकांना खायला…

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now