पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; स्वच्छ शहरांच्या यादीत मिळवला देशात पाचवा नंबर

इंदूर सलग पाचवेळा बनले देशातील सगळ्यात स्वच्छ शहर, जाणून घ्या तुमच्या शहराचा कितवा नंबर

देशातील सगळ्यात स्वच्छ शहरांची आणि राज्यांची यादी जाहीर, वाचा कोणते राज्य, शहर सगळ्यात स्वच्छ

मध्य प्रदेशातील इंदूर पुन्हा एकदा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. 2021 च्या स्वच्छता सर्वेक्षणनुसार, कोटा शहरातील कोटा उत्तर महानगरपालिका क्षेत्र 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सर्वात अस्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सलग पाचव्या वर्षी देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान मिळवला आहे. स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत गुजरातच्या सुरतला दुसरे तर आंध्र प्रदेशच्या विजयवाडाला तिसरे स्थान मिळाले आहे. सुरत 2019 च्या क्रमवारीत 14 व्या आणि 2020 मध्ये दुसऱ्या स्थानावर होते.

विजयवाडाने चार स्थान वरती आले आहे. हे शहर 2019 च्या क्रमवारीत 12 व्या आणि 2020 च्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर होते. या यादीत नवी मुंबई चौथ्या, पुणे पाचव्या, रायपूर सहाव्या, भोपाळ सातव्या, वडोदरा आठव्या, विशाखापट्टणम नवव्या आणि अहमदाबाद दहाव्या स्थानावर आहे.

सर्वात मोठी उडी छत्तीसगडमधून रायपूरने आणि महाराष्ट्रातील पुण्याने मारली आहे. रायपूर 2020 च्या क्रमवारीत 62 व्या स्थानावर होते. 2020 च्या क्रमवारीत पुणे 38 व्या क्रमांकावर होते. दहा लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची ही क्रमवारी आहे.

अशा 48 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये इंदूर अव्वल आहे आणि कोटा उत्तर महानगरपालिकेचे क्षेत्र सर्वात खालच्या म्हणजे 48 व्या स्थानावर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, राजस्थानच्या नगरविकास मंत्री शांती धारिवाल कोटा उत्तर विधानसभेच्या आमदार आहेत, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोटा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागांच्या यादीत राजधानी दिल्लीतील नवी दिल्ली महापालिका क्षेत्र सर्वात स्वच्छ घोषित करण्यात आले आहे. 2020 च्या क्रमवारीत ते आठव्या स्थानावर होते. अशा शहरांमध्ये छत्तीसगडचे अंबिकापूर दुसऱ्या स्थानावर तर आंध्र प्रदेशचे तिरुपती तिसऱ्या स्थानावर आहे.

अशा शहरांमध्ये सर्वात घाणेरडे शहर असल्याचा डाग बिहारच्या सासारामवर आहे, ज्याला 372 वा क्रमांक मिळाला आहे. मेघालयची राजधानी शिलाँग 371 व्या तर केरळच्या पलक्कडला 370 वे स्थान मिळाले आहे. स्वच्छतेच्या क्रमवारीत राज्यांना दोन श्रेणींमध्ये ठेवण्यात आले आहे.

यापैकी 13 राज्ये अशी आहेत जिथे 100 पेक्षा जास्त शहरी स्थानिक संस्था आहेत तर उर्वरित राज्यांमध्ये 100 पेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. १०० पेक्षा जास्त नगर असलेल्यांमध्ये छत्तीसगडला सर्वात स्वच्छ राज्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्राला दुसरे तर मध्य प्रदेशला तिसरे स्थान मिळाले आहे.

या यादीत गुजरात चौथ्या, उत्तर प्रदेश सहाव्या आणि बिहार तेराव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, 100 पेक्षा कमी नगर असलेल्या राज्यांमध्ये झारखंडला पहिला, हरियाणाला दुसरा आणि गोव्याला तिसरा क्रमांक मिळाला आहे. पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघातील वाराणसी शहराला गंगेच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला आहे.

या प्रकारात बिहारच्या मुंगेर आणि पाटणाला दुसरे आणि तिसरे तर उत्तर प्रदेशच्या कानपूरला चौथे स्थान मिळाले आहे. गुजरातमधील सुरत जिल्हा देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा ठरला आहे. त्याला 100 गुणांमधील 93.70 गुण मिळाले आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर दुसऱ्या तर राजधानी दिल्लीतील नवी दिल्ली जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा स्वच्छ जिल्हा ठरला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.