पुण्यातील चैत्राली कुलकर्णीच्या हत्येचं गूढ 4 वर्षांनंतरही कायम, काय आहे नेमकं प्रकरण??

पुणे | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा यासाठी मोठी मोहीम चालवण्यात आली. मात्र, 4 वर्षांपूर्वी पुण्यातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णी यांचाही असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूची चौकशी होऊन तिच्या मृत्यूला आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तिच्या वडिलांनी आणि आईने जिवाचा आटापीटा करुनही त्यांना न्याय मिळाला नाही.

आधी पोलिसांनी आणि त्यांनतर सीआयडीकडे तपास केल्यानंतरही चैत्रालीच्या मृत्यूचं गूढ उकललेले नाही. चैत्राली ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या कॉलेजच्या प्रमुखांचे राज्यातील बड्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्यानं पोलीस या प्रकरणाची चौकशी करत नसल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केलाय.

सुशांत सिंहप्रमाणे चैत्रालीच्या मृत्यूची चौकशी देखील सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी चैत्रालीच्या पालकांनी केली. त्यामुळं सुशांतला जर न्याय मिळाला असं म्हटलं जात असेल तर चैत्रालीला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

आज ना उद्या आपल्या लेकीला न्याय मिळेल आणि तिच्या मृत्यूच्या कारणांचा उलगडा होईल या आशेने सुनील कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी श्रुती कुलकर्णी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवत आहेत.

दरम्यान, चैत्राली कुलकर्णीच्या मृत्यूचा तपास सीबीआय करेल का?, चैत्रालीच्या आई-वडिलांना न्याय मिळेल का?, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.