मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधू पोलिसांच्या ताब्यात, फसवणूक केल्याचा आरोप

पुणे । पुणे परिसरातील प्रसिद्ध असलेले परांजपे बिल्डर यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे पुणे शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. परांजपे बिल्डर हे संपूर्ण पुणे शहरात प्रसिद्ध आहेत. या कारवाईमुळे मात्र अनेकांनी घरांचे व्यवहार केले आहेत, त्यांची चिंता वाढली आहे.

परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शशांक पुरुषोत्तम परांजपे आणि श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर बनावट दस्तावेज तयार करुन गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याचा आरोप आहे.

पोलीस आता परांजपे बिल्डर्सला मुंबईत घेऊन येत आहेत. मुंबईत या प्रकरणी त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील बिल्डर अमित लुंकड यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.

असे असताना आता प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधू यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. जवळच्या नातेवाईकांनीच ही तक्रार केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांची टीम पुण्यात दाखल झाली. त्यानंतर त्यांनी परांजपे बिल्डर यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. यामुळे कारवाईमुळे मात्र पुण्यात सर्वांना एकच धक्का बसला आहे. पुण्यात त्यांचे मोठे नाव आहे.

ताज्या बातम्या

नगरचा ‘हा’ शेतकरी एका एकरात कमवतोय १५ लाख, फक्त फोन घ्यायला आहेत ४ कर्मचारी, जाणून घ्या..

मोठी बातमी! आता १० वी मध्ये ९० टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना २ लाखांचे अनुदान

मोठी बातमी! राजकारणात हालचालींना वेग, नाना पटोलेंना तातडीने दिल्लीत दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.